शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 13:35 IST

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे

इंदापूर : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज (दि.१६) बिनविरोध निवड करण्यात आली. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे.    राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची सन २०२४ - २९ ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नवी दिल्लीत आज पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब झाले. त्यांची बिनविरोध निवड हा शरद पवारांना धक्का मानला जात आहे.    हर्षवर्धन पाटील हे देशातील व राज्यातील सहकारी साखर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी राज्यात महत्वाचे समजले जाणारे सहकार खात्याचे मंत्रीपद सुमारे नऊ वर्षे समर्थपणे सांभाळले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना या दोन्ही महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून अनेक वर्षे काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले आहे. शेतकरी व देशातील साखर उद्योगांच्या अडचणी व समस्या ह्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे मांडून त्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे.    दरम्यान,देशपातळीवरील साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. देश व राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या गुणवत्तावाढी बरोबरच त्यांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही निवडीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेAmit Shahअमित शाहharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखाने