लोणी काळभोरमध्ये घातक शस्त्रे बाळगणारा अट्टल गुन्हेगार अखेर स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 03:22 PM2021-07-20T15:22:50+5:302021-07-20T15:23:06+5:30

गुन्हेगारावर जिवे ठार मारण्याची धमकी देणे, जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, सार्वजनीक मालमत्तेचे तसेच नागरीकांचे वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

The hardened criminal carrying deadly weapons is finally located in Loni Kalabhor | लोणी काळभोरमध्ये घातक शस्त्रे बाळगणारा अट्टल गुन्हेगार अखेर स्थानबद्ध

लोणी काळभोरमध्ये घातक शस्त्रे बाळगणारा अट्टल गुन्हेगार अखेर स्थानबद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हेगारी कृत्यामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण

लोणी काळभोर : आपल्या साथीदारांसह लाकडी, दांडके, दगड विटा, सुरा, कु-हाड, कोयता, लोखंडी पाईप या सारखे घातक शस्त्रे जवळ बाळगून नागरिकात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला करण्यात आले आहे. या सराईत गुन्हेगारावर जिवे ठार मारण्याची धमकी देणे, जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, सार्वजनीक मालमत्तेचे तसेच नागरीकांचे वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

ऋषिकेश सुरेश पवार ( वय २३ वर्षे, रा. कदमवाकवस्ती ) स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ऋषिकेश पवार हा राहत असलेल्या परिसरामध्ये स्वतः तसेच त्याचे साथीदारांसह घातक शस्त्रे जवळ बाळगुन सामान्य नागरिकांवर दहशत करुन त्यांना मारहाण करुन, जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचेकडुन जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे तसेच नागरीकांचे वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत.

त्यांचे गुन्हेगारी कृत्यामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या पासुन जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरीक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. मोकाशी यांनी पवार यास स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव तयार करुन सादर केला होता. गुप्ता यांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करुन एम. पी. डी. ए. कायदयांतर्गत एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचा आदेश पारीत केला आहे. 

Web Title: The hardened criminal carrying deadly weapons is finally located in Loni Kalabhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.