शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आनंद देणारी झाडं जोपासायला हवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

पुणे : आपल्याला झाडे आॅक्सिजन देतात, आनंद देतात, आपलं दु:ख विसरून इतरांसाठी जगण्याचे बळ देतात. म्हणून झाडांचे संवर्धन करायला ...

पुणे : आपल्याला झाडे आॅक्सिजन देतात, आनंद देतात, आपलं दु:ख विसरून इतरांसाठी जगण्याचे बळ देतात. म्हणून झाडांचे संवर्धन करायला हवे, असे मत वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण, पुणे विभाग) रंगनाथ नाइकडे यांनी व्यक्त केले.

भामचंद्र डोंगर येथे हभप निवृत्तीबुवा गायकवाड आणि सुभद्राबाई गायकवाड यांच्य स्मरणार्थ आयोजित सप्ताहात ते बोलत होते. आई-नाना प्रतिष्ठानतर्फे ''नव्या वर्षाची सुरवात, संत तुकाराम महाराजांच्या सहवासात'' ही संकल्पना राबविली. नवीन वर्षात भामचंद्र डोंगरावर येऊन तुकोबांचे स्मरण करून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमातंर्गत डोंगरावर आई-वडिलांचे प्रतीक म्हणून वड, पिंपळ अशा झाडांची लागवड करण्यात आली. या वेळी बाळू लोंढे, शरद बुट्टे पाटील आदी उपस्थित होते.

नाईकडे म्हणाले, कोणताही समारंभ असेल तर झाड लावायला हवे. वाढदिवस किंवा इतर आनंदाचा क्षण असेल तर झाड लावून तो साजरा करायला हवा. त्या क्षणाची आठवण म्हणून ते झाड आपल्याला स्मरणात राहिल. ते झाड कायम आपल्याला आॅक्सिजन देईल. असे उपक्रम ठिकठिकाणी व्हायला हवीत. तरच भविष्यातील निसर्ग चांगला राहील.’’ कोरोनाचे संकट दूर होवो, अशी प्रार्थना देखील या वेळी करण्यात आली.