शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

दहावी फेरपरीक्षेला दीड लाख अर्ज

By admin | Updated: July 4, 2015 00:18 IST

पहिल्यांदाच जुलै व आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या दहावीच्या फेरपरीक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या निकालानंतर अर्ज

पुणे : पहिल्यांदाच जुलै व आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या दहावीच्या फेरपरीक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या निकालानंतर अर्ज करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळूनही अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे दिसते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीची फेरपरीक्षा आॅक्टोबरऐवजी जुलै व आॅगस्ट महिन्यात घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत तयारी केली. दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर झाला. तर फेरपरीक्षा दि. २१ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मंडळाला संपूर्ण तयारीसाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी मिळाला आहे. फेरपरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दि. १५ जूनपासून स्वीकारण्यास सुरुवात झाली. तर दि. २७ जूनपर्यत अंतिम मुदत देण्यात आली होती. सध्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, दि. २८ जूपर्यंत मंडळाकडे सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जाची संख्या खूप आहे, असे मंडळातील अधिकारीही सांगतात. (प्रतिनिधी)अभ्यासासाठी मिळाला कमी कालावधी फेरपरीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीही कमी कालावधी मिळाला आहे. आॅक्टोबरमधील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खूप वेळ मिळत होता. असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा आताच देण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी फेरपरीक्षेला २१ जुलैला सुरूवात होणार असून, दि. ५ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या तयारीसाठीही मंडळाला कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे परीक्षेचे नियोजन वेगाने केले जात आहे, असे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.