दीड लाखाची पिशवी पळविली

By Admin | Updated: April 18, 2017 02:53 IST2017-04-18T02:53:03+5:302017-04-18T02:53:03+5:30

येथील शिवाजी चौकात दुचाकीला लावलेली दीड लाखाची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार संतोष सुपेकर यांनी दिली

A half-a-mill bag ran away | दीड लाखाची पिशवी पळविली

दीड लाखाची पिशवी पळविली

दौंड : येथील शिवाजी चौकात दुचाकीला लावलेली दीड लाखाची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार संतोष सुपेकर यांनी दिली. दरम्यान, या आठवड्यात दुचाकीवरून पैशांची पिशवी पळवून नेण्याची त्याच ठिकाणावरून दुसरी घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
गेल्या पंधरवड्यात शिवाजी चौकातून १ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम असलेली पिशवी लंपास केली होती. सोमवारी (दि. १७) दत्तात्रय पाटोळे (रा. नानवीज, ता. दौंड) यांची दीड लाखाची रक्कम असलेली पिशवी पळविली. याप्रकरणी पोलिसांना फिर्याद दिली आहे. माझ्या बँकेच्या खात्यातून ५० हजार रुपये आणि पाहुण्यांच्याखात्यातून १ लाख रुपये असे दीड लाख रुपये घेऊन मोटारसायकलवरून (एमएच १२ क्यू ५८८७) जात असताना शिवाजी चौकात ट्रॅफिक जाम झाले. तेव्हा माझ्या दुचाकीच्या मागे व्यक्ती आली आणि म्हणाली, तुमचे १०० रुपये पडलेले आहेत. मी मागे वळून बघितले तेव्हा रस्त्यावर १०० रुपये पडलेले होते. ते उचलण्यासाठी वळताच दुचाकीला लावलेली दीड लाखाची रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

Web Title: A half-a-mill bag ran away