शारीरिक संबंध ठेवून गोळ्या खायला द्यायचा; बारामतीच्या उद्योगपतीवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:09 IST2025-10-30T11:08:55+5:302025-10-30T11:09:05+5:30

तरुणी नवऱ्यापासून विभक्त होण्याच्या निर्णयानंतर तणावात होती, यावेळी आरोपीने संपर्क करत आपण लग्न करू असे म्हणत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली

Hadapsar police register case against Baramati businessman for giving pills after having physical relations | शारीरिक संबंध ठेवून गोळ्या खायला द्यायचा; बारामतीच्या उद्योगपतीवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल

शारीरिक संबंध ठेवून गोळ्या खायला द्यायचा; बारामतीच्या उद्योगपतीवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल

हडपसर: राज्य सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर बारामतीच्या उद्योगपतीने विविध ठिकाणी नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी हडपसर येथे या उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज कुंडलिक तुपे असे त्याचे नाव आहे.

सन २०२१ ते १५ ऑक्टोबर २५ च्या कालावधीत ही घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सन २०२० मध्ये पीडितेने आपले शिक्षण पूर्ण करून राज्य सेवेची तयारी करण्याचे ठरवले. यामुळे यानंतर पीडितेने पुण्यामध्ये अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अभ्यासासाठी ती पुण्यात राहायला आली. याच दरम्यान २०२१ मध्ये पीडितेची आरोपी मनोज तुपे यांच्याशी बारामती येथे ओळख झाली.

मी मोठा उद्योगपती आहे, तुला व तुझ्या मैत्रिणीला चांगला जॉब लावून देतो, असं म्हणत पीडितेचा मोबाइल नंबर घेतला. दोघांमध्ये सातत्याने फोनवर बोलणे होत राहिले. मे २०२१ साली पीडिता अभ्यासासाठी पुण्यात राहायला गेली. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये आरोपी तुपे याने पीडितेला जेवणासाठी बोलावून हडपसरपर्यंत सोडतो, असं म्हणत गाडीतळाच्या जवळ गाडीतच मनाविरुद्ध शारीरिक संबंध केले. यानंतरदेखील अनेकदा आरोपीने पुण्यातील विविध हॉटेलमध्ये घेऊन जात लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर बलात्कार केला.

ऑक्टोबर २०२२ मध्ये पीडितेचे लग्न झाले. मात्र, ऑगस्ट २०२३ पासून पीडितेने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यावेळी पीडिता तणावात होती, यावेळी आरोपीने संपर्क करत आपण लग्न करू, संपर्क तोडू नकोस, असे म्हणत पुन्हा पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवायला लागला. मात्र, जुलै २०२५ मध्ये आरोपी पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत होता. लग्नाचा विषय काढला की, चिडून पीडितेसोबत भांडणे काढायचा. मात्र, माझे समाजात नाव आहे. मला तुझ्यासोबत लग्न करता येणार नाही, असे म्हणत आरोपीने लग्नाला नकार दिला. पीडितेने मी तुझी तक्रार करेल, असे सांगितले. मात्र, तुझे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. अनेकदा आरोपीने शारीरिक संबंध ठेवून गोळ्या खायला द्यायचा, असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे.

 

Web Title: Hadapsar police register case against Baramati businessman for giving pills after having physical relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.