शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अन् पवारांना आठवला गुरुजींचा ‘बुक्का!’

By admin | Updated: October 27, 2015 00:51 IST

राजकीय विश्वामध्ये भल्याभल्यांना धोबीपछाड देणारे आणि सहसा कुणाच्या हाती न लागणारे शरद पवार यांना त्यांच्या बालपणी शिक्षकांनी पाठीत घातलेल्या बुक्क्याची आठवण मात्र आजही ताजी आहे.

बारामती : राजकीय विश्वामध्ये भल्याभल्यांना धोबीपछाड देणारे आणि सहसा कुणाच्या हाती न लागणारे शरद पवार यांना त्यांच्या बालपणी शिक्षकांनी पाठीत घातलेल्या बुक्क्याची आठवण मात्र आजही ताजी आहे. ‘‘आजही पाठ दुखायला लागली की वाघमारे गुरुजींची आठवण येते’’ असे सांगत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपल्या बालपणीच्या आठवणीत आज रमले. निमित्त होते, मएसो इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याचे. पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शाळेतल्या अनेक आठवणींना त्यांनी दिलखुलासपणे उजाळा दिला. पवार म्हणाले, काटेवाडी (ता. बारामती) येथे वास्तव्यास असताना प्राथमिक शिक्षण येथील प्राथमिक शाळेत घेतले. या वेळी शिक्षण घेताना तेथील वाघमारे गुरुजी कडक शिस्तीचे. ते शिस्त लावण्यासाठी आम्हाला मान खाली घालून पाठीत बुक्का मारत. आजही पाठ दुखायला लागल्यावर त्यांची आठवण येते. मएसोच्या बी. जी. घारे सरांचा विद्यार्थ्यांमध्ये दरारा होता. त्यांचे नाव घेतले तरी विद्यार्थ्यांचा थरकाप उडत असे. तर निलांबरी वाटवे या गुणी शिक्षिका होत्या. त्यांची मुलगी आसावरी माझ्या वर्गात होती. ती अधूनमधून भेटत असते, अशी आठवण सांगितल्यानंतर तर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. पदाने मोठे झाल्यानंतरही ज्ञानी माणसांपुढे नतमस्तक व्हायचे असते असा मोलाचा सल्ला देत पवार म्हणाले, ही जाणीव ठेवून मी राजकीय जीवनात वाटचाल केली. संरक्षणमंत्री पदावर काम करताना सेनादलातील निवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. याचा महत्त्वपूर्ण उपयोग झाला. ज्ञान, समृद्धी आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षक पुढाकार घेतात. मएसोच्या शिक्षण संस्थेत हाच वसा शिक्षकांनी जपला. त्यामुळे अनेकांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यातून बारामतीच्या इतिहासात मएसोचे नाव घेतले जाते. या इंग्रजी शाळेसाठी ५ कोटी रुपये किमतीची १ एकर जमीन देणाऱ्या हरिभाऊ देशपांडे यांचे पवार यांनी कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष हरिभाऊ देशपांडे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, सचिव डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, मुख्याध्यापिका ज्योती क्षीरसागर, मुख्याध्यापक भगवानराव चव्हाण उपस्थित होते. आभार मएसोचे डॉ. भरत व्हनकटे यांनी मानले. (प्रतिनिधी)