शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पालकमंत्री म्हणतात, जपून वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:09 IST

मोर्चे-आंदोलनाने काही होणार नाही; धरणांत २० टक्के कमी पाणीसाठा

पुणे : पुण्याचे निम्याहून अधिक पाणी कमी केल्याने पुणेकरांमध्ये प्रचंड संताप आणि धास्ती असताना पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठा वाढविण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. महापालिका आयुक्त यावर अपील करणार आहेत. धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के पाणीसाठा कमी आहे. मोर्चे, आंदोलने करून धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार नाही. माझ्या घरासह प्रत्येक पुणेकराला पाणी जपून वापरावे लागणार आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन गिरीश बापट यांनी केले.स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायझरी फोरमची दुसरी बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बापट म्हणाले, सध्या पाण्यावरून शहरी-ग्रामीण वाद सुरु आहे. परंतु धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता प्रत्येकाला पाणी अत्यंत जपून वापरावे लागणार आहे. खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्यातून उसासाठी पाणी सोडले जाते असा गैरसमज पसरविला जात आहे. परंतु ग्रामीण भागात देखील पाण्याची गंभीर परिस्थिती असून, तेथील लोकसंख्येला पिण्यासाठी व जनावरांच्या चारा-पाण्यासाठी हे पाणी सोडण्यात येते आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने गुरुवारी दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका आयुक्त अपील करणार आहेत.खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत घालवण्यासाठी नियोजन केले जात आहे. धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे. शहरातील पाईपलाईन गेली तीस वर्षांपासून खराब झालेली असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर शहरातील पाणी वितरण पद्धतीत आणि वॉल सोडण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाड्या धुण्यासाठी आणि बागांसाठी वापरले जाता कामा नये. बेबी कॅनॉल आणि उजव्या कालव्याची दुरुस्ती केली जाणार आहे. ही दुरुस्ती केल्यानंतर ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल. टेमघर धरणाच्या गळतीमुळे ते रिकामे करण्यात आले आहे. त्याची दुरुस्ती झाल्यानंतर ३ टीएमसी पाणी मिळेल.शहरात पाण्याची ही परिस्थिती कुणाच्याही चुकीमुळे निर्माण झालेली नाही, तर निसर्गामुळे निर्माण झाली आहे. शहराला मिळणारे पाणी ११५० एमएलडीच्या खाली येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दरम्यान, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने गुरुवारी दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका आयुक्त लवकरच अपील करणार असल्याचे बापट यांनी येथे सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgirish bapatगिरीष बापटPuneपुणे