सोयाबीनमुळे भुईमुगाचे क्षेत्र घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:24 IST2018-09-15T00:24:30+5:302018-09-15T00:24:54+5:30
नगदी पिकांकडे लक्ष; रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे बसला फटका

सोयाबीनमुळे भुईमुगाचे क्षेत्र घटले
ओझर : जुन्नर तालुक्यात खरीप हंगामात या वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून, सोयाबीनच्या तुलनेत भुईमूग पिकाची पेरणीत निम्मयाने घट झाली आहे.
सोयाबीन व भुईमुग या पिकांकडे शेतकरी वर्ग नगदी पीक म्हणून पाहत आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळे व जमिनीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतील भुईमूग पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक घटकांच्या विनाशामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होत आहे.
जुन्नर तालुक्यात या वर्षी सोयाबीन पिकाची ६ हजार ७०० हेक्टरवर तर भुईमुग पिकाची ३ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबिन पिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये खर्च येतो. तर हेक्टरी २५ मेट्रिक टन उत्पादन मिळत असल्याचे तालुका कृषि अधिकारी हिरामन शेवाळे व जुन्नर तालुका कार्यालयीन कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी सांगितले.
सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी या हंगामत तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव मंडल विभागात शेतकरी गटा मार्फत केडीएस ३४४ या वाणाची प्रतेकी १० हेक्टरवर ८ प्रकल्पात नारायणगांव, पिंपळवंडी, कुरण, ओझर, धालेवाडी तर्फे हवेली, खोडद, वडगाव कांदळी गावातील शेतकºयांना सोयाबीन बी पुरविन्यात आले असून त्यांची पेरणी बीबीएफ (रुंद सरी वरुंभा) पद्धतीने करण्यात आली आहे.
३४ गावांमधे सोयाबीन पिकावर एकात्मिक किड व्यावस्थापनांतर्गत पक्षी थांबे, फेरोमन सापळे लावण्यात आले आहेत. या प्रकल्पास महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक व अधिकारी यांनी भेट देवून उत्पादन वाढीच्या उपक्रमबाबत समाधान व्यक्त केले. प्रकल्पातील प्रात्यक्षिक व माइक्रो निरीक्षण नोंदणीसाठी कृषि पर्यवेक्षक रामचंद्र गाडेकर, घनश्याम भादेकर, तान्हाजी भुजबळ, मालती गायकवाड, सुजाता पंधे, मनीषा ठोंबरे, पुष्पलता वाबळे, आशा सहारे, पी. जी. अडगळे यांनी किड रोगाविषयी मार्गदर्शन केले.