शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
3
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
4
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
5
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
6
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
7
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
8
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
9
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
10
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
11
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
12
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
13
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
14
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
15
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
16
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
17
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
18
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
19
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
20
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यातील जगताप दाम्पत्याचा निर्णय लयभारी; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची स्विकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 21:55 IST

दहावीपर्यंत गणवेश, दप्तर वह्या-पुस्तकांसह देणार मोफत शिक्षण 

सांगवी : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना मृत्यू ओढावला. कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने अनेकांच्या घराचा आधार हिरावला गेला. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झाले. त्यातील काही कुटुंबांत घरातील कर्त्यां व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर संकट कोसळले. यामध्ये अनेक अल्पवयीन मुले माता-पित्याच्या मायेला पोरकी झाली. त्यांचा जगण्याचा आधार हिरावला गेल्याने या मुलांचा प्रश्न गंभीर झाला. 

आई वडिलांचे छत्र हरविल्याने अनाथ झालेल्या मुलांचे उदरनिर्वाहासहित विविध प्रश्न घेऊन ऐरणीवर आला. याबाबत राज्य शासनाने देखील अशा मुलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जबाबदारी घेण्याबाबत निर्णय घेतला. आपण देखील खारीचा वाटा घ्यावा या हेतूने आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा निर्णय बारामती तालुक्यातील पणदरेच्या जगताप दाम्पत्याने घेतला आहे. विनोद जगताप,स्वरांजली जगताप असे या दाम्पत्याचे नाव आहे. 

पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे सचिव विनोद जगताप व जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापक स्वरांजली जगताप या दांपत्यांनी ज्या मुलांचे पालक कोरोना महामारीमुळे मृत्यू झाले आहेत अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्व जबाबदारी स्वीकारली आहे. या मुुलांना बारामती तालुक्यातील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर येथे दहावीपर्यंत गणवेश,दप्तर,वह्या पुस्तके देऊन मोफत शिक्षण देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तर सध्या अशा मुलांच्या शिक्षणासाठी जगताप यांच्याकडे कोरोनात मरण पावलेल्यांचे नातेवाईक संपर्क साधत आहेत. आई- वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन जगताप दाम्पत्याने केले आहे. ...........कोरोनासारख्या महाभंयकर संकटात अनेक  कुटुंब उध्वस्त झाली आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूने अनेक मुले पोरकी झाली. समाजाचे आपण देणे असतो या हेतूने अशा मुलांना आपल्या हातून एखाद्या कुटुंबाला हातभार लागला तर भविष्यात मोठे अधिकारी होतील.या सारखे आमच्या दाम्पत्यासाठी आयुष्यात दुसरे कोणतेच समाधान असणार नाही.-

विनोद जगताप, सचिव, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड

टॅग्स :BaramatiबारामतीEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूFamilyपरिवारStudentविद्यार्थी