शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कोरोनाचा हाहा:कार ; पण मुळशीतील ९ गावांनी कोरोना रोखला सीमेवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 18:45 IST

आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

पिरंगुट : संपूर्ण जगभर हाहा:कार माजविला असताना भारतामध्ये सुध्दा दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु, पुण्यात तर पहिल्यापासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता राहिला आहे. मात्र, याच कोरोना वरती मुळशी तालुक्यातील नऊ गावांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. कारण आतापर्यंत तरी मुळशी तालुक्यातील या नऊ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुळशी तालुक्यातील काही गावांनी मात्र योग्य नियोजनाच्या जीवावर कोरोनाला गावापासून दूरच रोखले आहे.यामध्ये आंबेगाव,डावजे,संबवे,वडगाव-वाघवाडी,वारक,ताम्हिणी,असदे-वेडे-भोडे व पोमगाव या नऊ गावांनी कोरोनावरती वर्चस्व मिळविले असून गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून ते आत्ता पर्यंत च्या दुसऱ्या लाटे पर्यंत या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. महत्वाचे म्हणजे या गावांमध्ये असलेले गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका,शिक्षिका राजकीय-सामाजिक शेतकरी वर्ग या सर्वांनी मिळून 'माझे गाव माझी जबाबदारी' या धोरणावर भर देत आपल्या गावामध्ये कोणाला कोरोना होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. यामुळेच कोरोनाच्या महाभयंकर अशा पहिल्या व दुसर्‍या लाटेमध्ये सुद्धा ही नऊ गावे अजून ही कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिली आहेत. 

या सर्व नऊ गावांच्या यशामध्ये आंबेगावचे ग्रामसेवक पूजा शिंदे,सरपंच उषा नानासाहेब मारणे,उपसरपंच तानाजी मारणे,डावजेचे ग्रामसेवक मोना सपकाळ,सरपंच रामदास मानकर,संबवेगावचे ग्रामसेवक वासनिक,सरपंच रेश्मा जोरी,उपसरपंच हनुमंत जोरी,वडगाव वाघवाडी ग्रामसेवक प्रशांत सूर्यवंशी सरपंच अर्चना वाघ,वारकचे ग्रामसेवक नीलिमा भुजबळ सरपंच शिल्पा पोकळे,ताम्हिणी-आदरवाडीचे ग्रामसेवक भरत शिरसाट सरपंच प्रियंका मरे उपसरपंच योगेश बामगुडे,असदेचे ग्रामसेवक लक्ष्‍मण साळवी सरपंच नरेश भरम,वेडे-भोडेचे ग्रामसेवक बी. टी.पाटील,सरपंच संगीता मारणे,पोमगावचे ग्रामसेवक तुकाराम मोरे, सरपंच सारिका ढोरे या सर्वांचे व ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघाचे सल्लागार हनुमंत सुर्वे यांनी सांगितले की, या सर्व गावांचा शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करुन महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत विभाग,जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच तहसीलदार व पंचायत समिती यांच्यावतीने सन्मानित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpirangutपिरंगुटcorona virusकोरोना वायरस बातम्या