शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडानिकेतनची रखडलेली बिले मंजूर

By admin | Updated: January 7, 2015 00:40 IST

महापालिकेच्या क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांच्या रिक्षाचालक व स्कूलबसचालकांची रखडलेली बिले महापालिका प्रशासनाकडून तातडीने मंजूर करण्यात आली आहेत.

पुणे : महापालिकेच्या क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांच्या रिक्षाचालक व स्कूलबसचालकांची रखडलेली बिले महापालिका प्रशासनाकडून तातडीने मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोमवारपासून करावी लागणारी वणवण आता थांबणार आहे. शिक्षण मंडळाकडून महापालिका प्रशासनाकडे अधिकारांचे हस्तांतर झाल्यानंतर, शाळांची बिले निघण्यास उशीर होत आहे. क्रीडानिकेतनच्या रिक्षा व व्हॅनचालकांची बिले गेल्या ८ महिन्यांपासून देण्यात आली नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडणे बंद केल्याच्या प्रकारास ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने बिले मंजूर करण्यात आली आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्याच्या हेतून सुरू करण्यात आलेल्या विद्यानिकेतन शाळांच्या धर्तीवर ३ क्रीडानिकेतन शहरामध्ये सुरू करण्यात आल्या. दत्तवाडी येथे सर्वांत पहिली क्रीडानिकेतन २००९ मध्ये सुरू झाली, त्यानंतर आता हडपसर व येरवडा येथे क्रीडानिकेतनची सुरुवात झाली आहे. विविध खेळांचे विशेष प्रशिक्षण येथे विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याने, अनेक चांगले खेळाडू या शाळांमधून तयार होत आहेत. तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेऊन काही निवडक विद्यार्थ्यांना क्रीडानिकेतनमध्ये प्रवेश दिला जातो. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत ही शाळा भरते. शहराच्या कानाकोपऱ्यांतून या शाळांमध्ये विद्यार्थी येतात, त्यात सकाळच्या व्यायाम व इतर प्रशिक्षणासाठी त्यांना लवकर यावे लागते. त्यामुळे महापालिकेकडून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी रिक्षा व व्हॅनची विशेष व्यवस्था केली आहे. बिले रखडण्याचा फटका या भावी खेळाडूंना बसत आहे. (प्रतिनिधी)आज बिले मिळतीलक्रीडानिकेतनच्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या रिक्षाचालक व स्कूलबसचालकांची बिले मंजूर करण्यात आली आहेत. त्यांना बुधवारी ती दिली जातील, अशी माहिती शिक्षणमंडळाचे शिक्षणप्रमुख बी. एम. दहिफळे यांनी दिली. शिक्षणमंडळाकडून महापालिकेकडे अधिकारांचे हस्तांतर झाल्याने बिले मंजूर होण्यास उशीर होत आहे.