शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई तत्काळ उपाययोजना मागणीचा ठराव मंजूर

By admin | Updated: April 16, 2017 03:57 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी टंचाई आढावा बैठक बोलावली होते. या बैठकीत जिल्हा परिषद

पुणे : जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी टंचाई आढावा बैठक बोलावली होते. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी ‘मागणी तसा टँकरचा पुरवठा सुरू करा, बंद नळ पाणीपुरवठा योजना सुरू कराव्यात,’ अशा मागण्या केल्या होत्या. या मागण्यांचा ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर करण्यात आला. लवकरच मागण्यांप्रमाणे निधीपुरवठा होईल. जिल्हा परिषद सदस्यांनी पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत टॅँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत, टंचाईग्रस्त गावांमध्ये हातपंपाची दुरुस्ती करावी, पाणीपुरवठा योजना दुरुस्त कराव्यात, विंधनविहिरी खोदाव्यात, शिवकालीन खडकातील टाक्या बांधाव्यात, पाणीपुरवठा योजनाचे वीजपुरवठा खंडित करू नये, टंचाईग्रस्त गावांमध्ये तत्काळ टॅँकर सुरू करावा, खेडमधील टंचाईग्रस्त गावांसाठी चाकसमान धरणातील पाणी नदीत सोडावे, आदिवासी आणि डोंगराळ भागात विंधनविहीर करण्यासाठी ३०० मीटर खोदाईस परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या केल्या आहेत. या बैठकीत पाणीपुरवठा अधिकारी दीपक कुलकर्णी यांनी काही गावांमधील पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी या वेळी सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)सदस्यांच्या सर्व मागण्यांचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मान्य केला आहे. या ठरावनुसार उपाययोजना करण्यासाठी निधी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी मंजूर करून द्यावा. सदस्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करणार आहे. टंचाईच्या समस्या प्राधान्याने सोडविणार आहे. - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद