टंचाई तत्काळ उपाययोजना मागणीचा ठराव मंजूर

By Admin | Updated: April 16, 2017 03:57 IST2017-04-16T03:57:15+5:302017-04-16T03:57:15+5:30

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी टंचाई आढावा बैठक बोलावली होते. या बैठकीत जिल्हा परिषद

Grant of resolution of demand for scarcity immediate measures | टंचाई तत्काळ उपाययोजना मागणीचा ठराव मंजूर

टंचाई तत्काळ उपाययोजना मागणीचा ठराव मंजूर

पुणे : जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी टंचाई आढावा बैठक बोलावली होते. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी ‘मागणी तसा टँकरचा पुरवठा सुरू करा, बंद नळ पाणीपुरवठा योजना सुरू कराव्यात,’ अशा मागण्या केल्या होत्या. या मागण्यांचा ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर करण्यात आला. लवकरच मागण्यांप्रमाणे निधीपुरवठा होईल.
जिल्हा परिषद सदस्यांनी पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत टॅँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत, टंचाईग्रस्त गावांमध्ये हातपंपाची दुरुस्ती करावी, पाणीपुरवठा योजना दुरुस्त कराव्यात, विंधनविहिरी खोदाव्यात, शिवकालीन खडकातील टाक्या बांधाव्यात, पाणीपुरवठा योजनाचे वीजपुरवठा खंडित करू नये, टंचाईग्रस्त गावांमध्ये तत्काळ टॅँकर सुरू करावा, खेडमधील टंचाईग्रस्त गावांसाठी चाकसमान धरणातील पाणी नदीत सोडावे, आदिवासी आणि डोंगराळ भागात विंधनविहीर करण्यासाठी ३०० मीटर खोदाईस परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या केल्या आहेत.
या बैठकीत पाणीपुरवठा अधिकारी दीपक कुलकर्णी यांनी काही गावांमधील पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना
करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी या वेळी सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)

सदस्यांच्या सर्व मागण्यांचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मान्य केला आहे. या ठरावनुसार उपाययोजना करण्यासाठी निधी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी मंजूर करून द्यावा. सदस्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करणार आहे. टंचाईच्या समस्या प्राधान्याने सोडविणार आहे.
- विश्वास देवकाते,
अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Grant of resolution of demand for scarcity immediate measures