शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 17:50 IST

लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा कल्याणकारी योजना हे सरकार राबवत आहे

भीमाशंकर: विकास व कल्याण याची सांगड घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. भीमाशंकराच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी समाधानी व आनंदी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या व पाचव्या श्रावणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरददादा सोनवणे भीमाशंकर दर्शनासाठी आले होते. 

वीस वर्षापासून दरवर्षी एकनाथ शिंदे भीमाशंकर दर्शनासाठी येत असतात. यावर्षी खराब हवामान असतानाही लांडेवाडी येथे हेलिकॉप्टरने येऊन पुढे भीमाशंकर दर्शनासाठी आले भीमाशंकर मध्ये दाट धुके व पावसाळी वातावरण होते. मंदिरात उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे यांच्या वेदपठणात मुख्यमंत्र्यांची पूजा पार पडली. त्यानंतर भीमाशंकर मधील सर्व ब्राह्मणांच्या उपस्थितीत पुण्यवचन झाले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कोदरे यांनी आराखड्या बाबत काही सूचना मांडल्या. भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना आंघोळीसाठी ज्ञानव्यपी कुंडाजवळ व्यवस्था व्हावी अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,  महाराष्ट्र देशात प्रगतीमध्ये सर्वात अग्रभागी असलेले राज्य आहे. या राज्यात आपण लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा कल्याणकारी योजना हे सरकार राबवत आहे. पुढील वर्षी श्रावण महिन्यात मुख्यमंत्री म्हणून येण्याची संधी जनतेचा व भीमाशंकर च्या आशीर्वाद असेल तर मिळेल. भीमाशंकर मध्ये भक्तांसाठी ज्या ज्या सुविधा करता येतील त्या सर्व सुविधा सुविधा केल्या जातील कुठे सरकार कमी पडणार नाही. भीमाशंकर विश्वस्त व ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. आढळराव एकनाथ शिंदे यांच्या कडे पुन्हा जाणार का असा प्रश्न मुख्यमंत्री यांना विचारला असता आढळराव पाटील कुठे असते तरी ते माझ्यासोबतच आहेत असे उत्तर त्यांनी दिले. 

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरTempleमंदिरEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण