Supriya Sule: कशाचीही दखलच न घेणारे सरकार; सुप्रिया सुळेंची स्वारगेट पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:17 IST2025-07-11T12:17:06+5:302025-07-11T12:17:35+5:30
आमदारांसारखी व्यक्ती एखादा गावगुंडासारखे गरीब हॉटेल कर्मचाऱ्याला रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करते, समाजमाध्यमांवर त्याचे चित्रीकरण फिरते. मात्र, सरकार काहीच करत नाही

Supriya Sule: कशाचीही दखलच न घेणारे सरकार; सुप्रिया सुळेंची स्वारगेट पोलिसांकडे तक्रार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात स्वारगेटपोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. राज्यात अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. मात्र, सरकार त्याची दखलच घ्यायला तयार नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेत त्यांना पक्षकार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्यात, असे सांगितले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके, काकासाहेब चव्हाण व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या की, अहिल्यानगरमध्ये खोटे सरकारी अध्यादेश काढून कोट्यवधी रुपयांची सरकारी कामे मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आमदारांसारखी व्यक्ती एखादा गावगुंडासारखे गरीब हॉटेल कर्मचाऱ्याला रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करते, समाजमाध्यमांवर त्याचे चित्रीकरण फिरते. मात्र, सरकार काहीच करत नाही, पुण्यासारख्या शहरात कोयता गँग दहशत माजवत आहे. मात्र, सरकार यावरही काही करीत नाही. अशा सरकारविरोधात तक्रार करण्याचा हक्क सामान्य नागरिकांना आहे व तो आम्ही बजावत आहोत. पोलिसांनी याबाबत सरकारला काय ते कळवावे.