बारामतीत सुरु होणार शासकीय नर्सिंग महाविद्यालय; मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 05:27 PM2024-02-14T17:27:01+5:302024-02-14T17:28:37+5:30

बारामतीला मेडीकल हब म्हणुन ओळख निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पुर्णत्वाच्या दिशेने

Government Nursing College to be started in Baramati Decision in the Cabinet meeting | बारामतीत सुरु होणार शासकीय नर्सिंग महाविद्यालय; मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

बारामतीत सुरु होणार शासकीय नर्सिंग महाविद्यालय; मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

बारामती: बारामती येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे.राज्यमंत्री मंडळाची बुधवारी(दि १४) बैठक पार पडली.यावेळी राज्यात सहा ठीकाणी शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये बारामतीच्या नर्सिंग महाविद्यालयाचा समावेश आहे. त्यामुळे  आता बारामतीची ‘मेडीकल हब’ ओळख अधिक गडद बनली आहे.

अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविदयालय, आयुर्वेदीक महाविद्यालयापाठोपाठ आता बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालयही सुरु होणार आहे.राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्यमंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या मुळे आता बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणार असल्याने पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे. बारामतीला मेडीकल हब म्हणुन ओळख निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पुर्णत्वाच्या दिशेने आहे. पवार यांच्याच पुढाकाराने बारामतीत हे महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

दरम्यान, येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले आहे. शासकीय नाममात्र दरात दररोज किमान सातशे रुग्ण येथे औषधोपचार घेतात. येथे सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच एमआरआय देखील येत्या काही दिवसात सुरु होत आहे. तसेच मेडद येथील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, माळेगांव येथे हे महाविद्यालय सुरु झाले आहे. येत्या वर्षभरात ही इमारत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न आहेत.त्या मध्ये राज्याच्या विविध भागात कुशल वैदयकीय मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालय उभारणी लवकरच या बाबतचा अध्यादेश जारी होऊन पुढील प्रक्रीया सुरु होणार आहे.त्यामुळे बारामतीत वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Government Nursing College to be started in Baramati Decision in the Cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.