ओतूर: पिंपरी पेंढार गावाच्या यात्रेमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीला अटक करून चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी सागितले. अधिक माहिती अशी की, ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत दि. २४ एप्रिल रोजी पिंपरी पेंढार येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला पुरुषांना ग्रामस्थांनी पकडले असल्याचा फोन पोलिसांना आला. तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित संशयित महिला, पुरुष यांना ताब्यात घेतले चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देत होते. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून तिचे एकूण दीड तोळे मंगळसूत्र १ लाख ६० हजार रुपये किमतीचे चोरी झाल्याबाबत ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुरेश गौतम चव्हाण, २) योगिता गणेश पवार, ३) माया दुर्वेश पवार रा. इमामपूर ता पैठण जि. छत्रपती संभाजी नगर यांना मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सो. जुन्नर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक चौकशी केल्यावर त्यांनी मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात वापरलेली मारुती अल्टो गाडी एम.एच २० ए.जी ९२०६ ही दोन लाख ५० हजार अंदाजे किमतीची जप्त करण्यात आली आहे. दीड तोळे मंगळसूत्र अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये असा एकूण ४ लाख ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रवींद्र चौधर, सहा. पोलीस निरीक्षक ओतूर लहू थाटे, पोलिस उपनिरीक्षक ओतूर युवराज जाधव, संदीप आमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश साबळे, सुरेश गेंगजे,नामदेव बांबळे, महेश पठारे, भरत सूर्यवंशी, धनंजय पालवे, ज्योतीराम पवार, विश्वास केदारी तसेच पोलीस मित्र शंकर अहिनवे, सचिन पानसरे यांनी केला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश साबळे, महिला पोलीस अंमलदार मयुरी खोसे हे करीत आहेत.
पिंपरी पेंढार येथील यात्रेमध्ये चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:59 IST