शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या जीवांना उन्हाचा डंख

By admin | Updated: May 12, 2015 04:28 IST

उन्हाचा तडाखा वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. मानवाप्रमाणे पक्षी आणि प्राणीही त्यास अपवाद नाहीत. खाद्य आणि पाण्याअभावी पक्ष्यांची

पुणे : उन्हाचा तडाखा वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. मानवाप्रमाणे पक्षी आणि प्राणीही त्यास अपवाद नाहीत. खाद्य आणि पाण्याअभावी पक्ष्यांची तर तडफड होत आहे. नागरिकांनी भूतदया दाखविण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. घराबाहेर, अंगणात, खिडकीत, गॅलरीत पक्ष्यांसाठी खाद्य आणि पाणी ठेवल्यास पक्ष्यांना ‘घास’ मिळून उन्हाळ्याच्या झळा काहीशा सुसह्य होतील.गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या झळा वाढतच आहेत. सकाळपासून उन्हाचे चटके बसत आहेत. दुपारनंतर तर घराबाहेर पाऊल ठेवणे अवघड झाले आहे. असह्य परिस्थितीत रहदारी तुरळक दिसून येऊ लागली आहे. काही भागांत तर दुपारी रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळते. कडक उन्हामुळे नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. पक्षी, प्राणी यांची तर अवस्था अधिक बिकट आहे. चारा आणि पाण्याच्या शोधार्थ त्यांची भटकंती सुरू आहे. एरवी मानवी आश्रयास न येणारे पक्षी- चिमणी, कावळा, कबुतर, पारवा अन्नपाण्याच्या शोधात घराच्या गॅलरीत प्रवेश करू लागले आहेत. एरवी विद्युत खांबाच्या तारेवर जमणारा थवा, वृक्षवेलीवर भिरभिरणारे पक्षी यांचा किलबिलाट आता घराच्या अंगणात ऐकू येऊ लागला आहे. अर्थातच, त्यांना जाणवणाऱ्या भीषण उन्हाळ्यात ते चारापाण्याच्या शोधार्थ थेट घराच्या अंगणापर्यंत येऊ लागले आहेत. या मुक्या जीवांना पाहुणचाराची गरज आहे. ती भागवण्यासाठी घराच्या खिडकीत, गॅलरीत अंगणातील झाडाजवळ भिरभिरणाऱ्या या मुक्या जीवांसाठी पाणी, खाद्यान्न ठेवा, असे सांगण्याची वेळ आली आहे. शहर आणि उपनगरात शेकडो पक्षी वास्तव्यास आहेत. चिमणी, कावळा, पारवे, कोकिळा, साळुंकी, टिटव्या, घार, घुबड, ससाणा, वटवाघूळ या जातींच्या असंख्य पक्ष्यांचे दर्शन होते. सकाळी व संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. सध्याच्या तीव्र उन्हाळी वातावरणात या पक्ष्यांची अवस्था तर बिकट होते. अन्नानासाठी बाहेर पडल्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. उन्हात अन्न आणि पाण्यासाठी भटकावे लागते. असह्य उन्हामुळे असंख्य पक्ष्यांचा होरपळून व तडफडून मृत्यू होतो. पक्ष्यांची ही तडफड नागरिक रोखू शकतात. यासाठी नागरिकांनी घराबाहेर, खिडकीत, गॅलरीत, अंगणात पाण्याचे छोटे भांडे ठेवावे. दुसऱ्या भांड्यात धान्य ठेवावे. पक्ष्यांना सहज पोहोचता येईल, अशा ठिकाणी खाद्य व पाणी ठेवावे. खाद्यामध्ये पाणी मिसळणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यामुळे पक्ष्यांना सहजपणे खाद्य आणि पाणी उपलब्ध होईल. आपल्या परिसरात पक्ष्यांचे वास्तव्य वाढेल. याच पद्धतीने दुकानदार, विक्रेते, टपरीवाले पक्ष्यांच्या घासाची सोय करू शकतील. (प्रतिनिधी)