पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; धरण क्षेत्रात एका दिवसात सव्वा महिना पाणी पुरेल इतका पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 01:33 PM2020-08-05T13:33:00+5:302020-08-05T13:37:30+5:30

अशीच पावसाची कृपादृष्टी राहिली तर पाणी कपातीचे संकट होऊ शकते दूर..!

Good news for Pune ; The dam area will receive enough rain to supply water one month to city in a single day | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; धरण क्षेत्रात एका दिवसात सव्वा महिना पाणी पुरेल इतका पाऊस

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; धरण क्षेत्रात एका दिवसात सव्वा महिना पाणी पुरेल इतका पाऊस

Next
ठळक मुद्देधरण साठ्यात २ टीएमसी वाढ, धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात गेल्या वर्षीपेक्षा १६ टीएमसी पाणीसाठा कमी

पुणे : पुणे महानगरपालिका व जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एका दिवसात २ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे .बुधवारी सकाळी खडकवासला धरण प्रकल्पात १२.०७ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला.मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणांत १६.२६ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. धरण क्षेत्रात याच पद्धतीने पाऊस सुरू राहिला तर पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होऊ शकते.
    खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला , पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी ५ ऑगस्ट रोजी धरणात २८.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, ५ ऑगस्ट २०२० रोजी या चारही धरणांमध्ये एकूण १२.०७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक नसल्यास जलसंपदा विभागाकडून १५ ऑगस्टनंतर पाणी कपातीचा निर्णय घेतला जातो. परंतु, पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा ५ ऑगस्टनंतर  धरणातील पाण्याचे नियोजन केले जाईल,असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मंगळवारी खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणांमध्ये एकूण ९.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता. तर बुधवारी धरणात १२.०७ पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे एका दिवसात खडकवासला धरण प्रकल्प दोन टीएमसी पाणी साठा वाढला.
खडकवासला धरण प्रकल्पातील पानशेत व वरसगाव धरणात ५ टीएमसी , तर खडकवासला धरणात बुधवारी १ टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
-----------------------
 खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा
धरणाचे नाव  ४ऑगस्ट           ५ऑगस्ट
खडकवासला ०.६९              १.००
वरसगाव       ४.२७             ५.०५
 पानशेत        ४.२४            ५.०९
 टेमघर.          ०.७७           ०.९३

Web Title: Good news for Pune ; The dam area will receive enough rain to supply water one month to city in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.