चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! यंदाचा ’PIFF’ सिनेमागृहात अनुभवता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 07:35 PM2021-11-17T19:35:31+5:302021-11-17T19:49:15+5:30

जगातील जवळपास दीडशेहून अधिक उत्तमोत्तम चित्रपट पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे

Good news for movie lovers! This year's 'PIF' will be available in cinemas | चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! यंदाचा ’PIFF’ सिनेमागृहात अनुभवता येणार

चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! यंदाचा ’PIFF’ सिनेमागृहात अनुभवता येणार

Next

पुणे : देशविदेशातील दर्जेदार चित्रपटांची मेजवानी देणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) पुढच्या महिन्यात ऑफलाईन होणार आहे. मार्चमधील हा नियोजित महोत्सव कोरोनामुळे स्थगित झाल्याने रसिकांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले. आता हा महोत्सव २ ते ९ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. जगातील जवळपास दीडशेहून अधिक उत्तमोत्तम चित्रपट पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.  महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी उद्या (दि. 18) पासून तसेच चित्रपटगृहांमधील नोंदणी २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्यातर्फे २ ते ९ डिसेंबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (nfai pune) येथे होणार आहे. यंदाचे महोत्सवाचे 19 वे वर्ष आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट
संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर आणि चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे उपस्थित होते. 

शुड द विंड ड्रॉप, इन द शॅडोज, अप्परकेस प्रिंट, ए कॉमन क्राइम, द एलियन, काला अझार, ट्रू मदर्स, नाइट ऑफ द किंग्ज, रशियन डेथ, डिअर कॉमरेड्स, शर्लटन, द बेस्ट फॅमिलिज्, आयझॅक, १२ बाय १२ अनटायटल्ड या चित्रपटांची जागतिक स्पर्धा विभागासाठी निवड झाली आहे.

चार महिन्यात दोनदा पिफ

नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) करोनामुळे यंदा जानेवारी महिन्यात झाल्याने जानेवारीत होणा-या पिफच्या तारखा बदलण्यात आल्या. मात्र, मार्चमध्ये आयोजित करण्यात आलेला पिफ करोनामुळे स्थगित झाला. यंदाचा पिफ आता डिसेंबरमध्ये पार पडल्यानंतर पुढील वर्षीचा पिफ नेहमीच्या वेळपत्रकानुसार आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उशिरात उशिरा फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत २० व्या पिफचे
आयोजन झाल्यास चित्रपटप्रेमींना कमी अंतरामध्ये दोन महोत्सव अनुभवता येतील, असे डॉ. जब्बार पटेल यांनी स्पष्ट केले.

मराठी स्पर्धात्मक विभागासाठी निवडलेले चित्रपट

मकरंद माने दिग्दर्शित- पोरगा मजेतंय
विठ्ठल मच्छिंद्र भोसले दिग्दर्शित- फिरस्त्या
वैभव खिस्ती आणि सुह्रद गोडबोले दिग्दर्शित- जून
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित- गोदाकाठ
मकरंद अनासपुरे दिग्दर्शित- काळोखाच्या पारंब्या
विशाल कुदळे दिग्दर्शित -टक टक

या चित्रपटांचा होणार प्रिमिअर

शैलेंद्र कृष्णा दिग्दर्शित- गोत
गिरीश मोहिते दिग्दर्शित- ताठ कणा
महेश कंद दिग्दर्शित- कंदील
किरण निर्मल दिग्दर्शित- मे फ्लाय
प्रशांत दत्तात्रय पांडेकर दिग्दर्शित- जीवनाचा गोंधळ

Web Title: Good news for movie lovers! This year's 'PIF' will be available in cinemas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.