शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर, कोरोना लस तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी (दि. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी (दि. ७) केंद्र सरकारकडे अर्ज केला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी व्टिट करुन ही माहिती दिली. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यास लसीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळू शकणार आहे.

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनिकातर्फे संशोधित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसींचे उत्पादन सुुरु आहे. सध्या सिरममध्ये दर महिन्याला ५ ते ६ कोटी डोस तयार होत आहेत. जानेवारीपासून १० कोटी डोसचे उत्पादन केले जाणार आहे. लस उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती.

“आपत्कालीन परिस्थितीत ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या वापरासाठी येत्या दोन आठवड्यांमध्ये औषध महानियंत्रकांकडे अर्जाद्वारे मागणी करणार आहे,” असे आदर पुनावाला यांनी मोदी यांच्या पुणे भेटीनंतर स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली असल्याची माहिती त्यांनी व्टिट करुन दिली. यापूर्वी फायझर या अमेरिकेतील कंपनीने दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे आपत्कालीन परिस्थितीत लसीच्या वापराला परवानगी देण्याची मागणी केली आहे.

‘‘सर्वांना दिलेल्या वचनानुसार, २०२० हे वर्ष संपण्यापूर्वी सिरमने ‘मेड इन इंडिया’ ‘कोव्हिशिल्ड’ या पहिल्यावहिल्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. यामुळे हजारो जणांचे प्राण वाचू शकणार आहेत. आम्हाला मिळत असलेल्या भरघोस पाठिंब्याबाबत मी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो’’, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.

कोरोनावरील लस वितरणासाठी सिरमकडून भारतालाच प्राधान्य दिले जाणार आहे. जुलै २०२१ पर्यंत केंद्र सरकारला ३० ते ४० कोटी डोस पुरवण्याचे लक्ष्य सिरम इन्स्टिट्यूटसमोर आहे. त्यादृष्टीने उत्पादन प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.