शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण तरुणांसाठी कृषी क्षेत्रातील सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

विद्यार्थी मनापासून अभ्यास करून यशस्वी होतात. ही चांगली बाब आहे. त्यामध्ये ज्यांना वर्ग १ आणि वर्ग २ अधिकारी होण्याची ...

विद्यार्थी मनापासून अभ्यास करून यशस्वी होतात. ही चांगली बाब आहे. त्यामध्ये ज्यांना वर्ग १ आणि वर्ग २ अधिकारी होण्याची आवड आहे. त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. परंतु, यासाठी कालावधी किती लागेल हे सांगता येत नाही. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी चिकाटी आणि जिद्द असावी लागते.

स्पर्धा परीक्षा व्यतिरीक्त इतरही परीक्षा देऊन नोकरीच्या संधी कृषी पदवीधरांना आहेत. विविध बँकांमधील वेगवेगळी पदे विशेषत : कृषी अधिकारी, कृषी विभागातील वेगवेगळी पदे, जसे वेगवेगळ्या रोपवाटीका, बियाण्यांसंबंधीच्या कंपन्या, माहिती तंत्रज्ञानामधील कृषीसंबंधीच्या कंपन्या यामध्येही कृषी पदवीधरांना संधी आहेत. त्याचा उपयोग कृषी पदवीधरांनी आणि कृषी शाखांमध्ये जाणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांनी घ्यावा.

कृषीसंबंधी आवड असणाऱ्या तरुणांना नोकरीव्यतिरीक्त व्यवसायाच्याही संधी आहेत. या व्यवसायामध्ये बियाण्यांची निर्मीती आणि विक्री करून चालून स्वत:चा व्यवसाय करणे. बियाण्यांबरोबर खताचा व्यवसाय करून शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देण्याचे समाधान मिळवणे.

दर्जेदार रोपवाटिका तयार करून गरजू शेतकऱ्यांना फळझाडांची आणि भाजीपाल्यांची रोपे निर्माण करून त्यांची विक्री करून खताचाही यशस्वी व्यवसाय निर्माण करता येऊ शकतो. दर्जेदार बियाणे, दर्जेदार रोपनिर्मितीबरोबरच झाडांना आणि पिकांना लागणारी अन्नद्रव्यनिर्मिती जसे सेंद्रिय खतांची निर्मिती, जैविक खतांची निर्मिती‌ आणि गरजू शेतकऱ्यांना आवश्यक असणारा सल्ला देण्याची योजना उभारून स्वत:चा व्यवसाय करून ग्रामीण भागामध्ये यशस्वी उद्योजक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या उद्योगांच्या यादीत कलेलाही फार संधी आहेत. शेतकऱ्यांना हवी असणारी यंत्रे आणि अवजारे निर्मिती आणि त्यांची विक्री करण्याच्या संधी आहेत.

भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकांची उत्पादकता वाढविण्याचे क्षेत्र अवगत केले आहे. तृणधान्ये, भाजीपाला, फळभाज्या, फळबागा, औषधी वनस्पती इत्यादीचे चांगले उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. परंतु, त्यांची विक्री व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक फायदा घेता येत नाही. पिकविलेल्या मालाचा बहुतेक नफा विक्री साखळीतील व्यापारी आणि दलाल घेत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचा माल शेतकऱ्यांनीच विकावा यासाठी भारत केंद्र आणि राज्य शासन पुढाकार घेत आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करावी.

शेतीमाल गरजू ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी पदवीधर आणि इतर पदवीधर तरुण चांगला व्यवसाय उभा करू शकतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री केल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. त्याचबरोबर तरुणांनाही चांगला व्यवसाय करण्याच्याही संधी प्राप्त होईल. त्यासाठी अनुदान मिळण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यात पिकविलेल्या मालाची थेट विक्री, पिकविलेल्या मालामध्ये प्रोसेसींग करून विक्री, दर्जेदार रोपांची विक्री, बियाणे निर्मिती आणि विक्री, सेंद्रिय आणि जैविक खतनिर्मिती व विक्री, रासायनिक खतांची विक्री, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री आदींचा समावेश करता येईल, वरील सर्व बाबींचा विचार करून ग्रामीण भागातील तरुणांनी यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी या संधीचा उपयोग करावा.

- डॉ. सुरेश पवार, कृषी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी