शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचे हातपाय बांधुन दागिन्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 19:44 IST2019-07-12T19:40:55+5:302019-07-12T19:44:19+5:30

टॉवेलने हातपाय बांधुन चाकुचा महिलेच्या अंगावरील सुमारे ३२ हजार रुपये किंमतीचे दागिने दोघा चोरट्यांनी नेले.

gold jewellery theft of women in baramati | शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचे हातपाय बांधुन दागिन्यांची चोरी

शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचे हातपाय बांधुन दागिन्यांची चोरी

ठळक मुद्देशहरात भर दिवसा घडला प्रकार

बारामती : शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचे टॉवेलने हातपाय बांधुन चाकुचा धाक दाखवुन तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावुन नेण्याचा प्रकार बारामती शहरातील बोरावके वस्ती येथे घडला. या महिलेच्या अंगावरील सुमारे ३२ हजार रुपये किंमतीचे दागिने दोघा चोरट्यांनी नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. शहरात भर दिवसा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
 उषा संभाजी कांबळे (वय ४०, रा.बोरावकेवस्ती शिवाजीनगर कसबा बारामती ता. बारामती जि.पुणे ) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि ११) दुपारी २.३० दरम्यान  बारामती शहरातील बोरावके वस्ती शिवाजीनगर कसबा हेंमत गरगटे यांच्या शेतात उषा कांबळे शेळ्या चारत होत्या. शेळया चारीत असताना दोन अनोळखी युवक त्या ठिकाणी आले. त्यांनी कांबळे यांचे हातपाय टॉवेलने बांधले. तसेच चाकुचा धाक दाखवुन, बळजबरीने त्यांच्या  कानातील कर्णफुले, गळयातील मनी मंगळसूत्र व पायातील चांदीच्या पट्या व मोबाईल असा सुमारे ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरीने हिसकावून चोरून नेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश अस्वर करीत आहेत.    
   

Web Title: gold jewellery theft of women in baramati