शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोड ‘पीएमआरडीए’कडे द्या

By admin | Updated: August 24, 2015 03:08 IST

गेल्या २८ वर्षांपासून शहरात अंतर्गत रिंग रोड (एचसीएमटीआर) प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप महापालिकेला भूसंपादन करण्यात यश आलेले नाही.

पुणे : गेल्या २८ वर्षांपासून शहरात अंतर्गत रिंग रोड (एचसीएमटीआर) प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप महापालिकेला भूसंपादन करण्यात यश आलेले नाही. तसेच, अधिका-यांची भूसंपादनासाठी उदासिनता दिसते. त्यामुळे हा प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे देण्यात यावा, असे पत्र उपमहापौर आबा बागुल यांनी दिले आहे. महापालिकेच्या १९८७ च्या प्रारुप विकास आराखड्यात सुमारे ३४ किलोमीटरचा अंतर्गत रस्ते जोडणारा एचसीएमटीआरचा प्रकल्प प्रस्तावित केला. त्यामुळे मध्यवर्ती शहरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. मात्र, एचसीएमटीआर प्रकल्पासाठी भूसंपादनाचा अडथळा आला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करता येणार नसल्याचे जिल्हाधिका-यांनी कळविल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. मात्र, त्याविषयी मुख्य सचिव नितीन करीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरून महापालिका प्रशासनाची या प्रकल्पाच्या भूसंपादनाविषयीची उदासिनता दिसून येते. दरम्यान, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी हा प्रकल्प २८ महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, महापालिकेतून या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. प्रत्यक्षात महापालिकेकडून २८ वर्षांत प्रकल्पाचे भूसंपादन झालेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी भूसंपादनासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा पीएमआरडीएकडे प्रकल्प देण्यात यावा, अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे. (प्रतिनिधी)