शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

प्राण्यांना खाण्याऐवजी त्यांना जगण्याचा अधिकार द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 8:38 PM

मानवाकडून अनेक प्राण्यांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवून प्राण्यांच्या हक्क-अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी भारतातील प्राणी प्रेमींनी एकत्र येऊन आज विराट प्राणी मुक्ती मोर्चा काढला होता.

पुणे : अन्न, कपडे आणि वस्तूंसह अनेक कारणांमुळे मानवाकडून अनेक प्राण्यांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवून प्राण्यांच्या हक्क-अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी भारतातील प्राणी प्रेमींनी एकत्र येऊन आज विराट प्राणी मुक्ती मोर्चा काढला होता. यामध्ये प्राणी शोषण मुक्ती क्षेत्रात काम करणारे  देशासह परदेशातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्राणी हक्कांविषयी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्राणी हे देखील आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असून त्यांचे संरक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे हे अधोरेखित करण्यासाठी या मोचार्चे आयोजन केले होते. 

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान येथून सुरू झालेला हा मोर्चा डेक्कन, फर्ग्युसन रोड मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौकातून मॉडर्न कॉलेज मार्गे पुन्हा संभाजी उद्यान येथे आला. त्याठिकाणी या मोचार्चा समारोप झाला. रविवारी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात ३०० च्या आसपास कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात फिनलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदी देशांतील प्राणीमित्र कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यापूर्वी बंगलोर, मुंबई याठिकाणी मोर्चा काढण्यात आला असून येत्या काळात दिल्लीला देखील मोठ्या संख्येने आंदोलन करणार असल्याचे अ‍ॅनिमल लिबरेशन मार्चच्या वतीने सांगण्यात आले. देशातील वेगवेगळ्या भागातील तरुण कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होत आहेत. प्राण्यांशी होणारा दुर्व्यवहार, त्यांच्याशी केले जाणारे कृर वर्तन आणि त्यांना मिळणारे असुरक्षित वातावरण या सगळ्या विरोधात काढण्यात आलेल्या या विराट मोर्चात पशु अधिकार आणि मुक्तता यावर विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. सुमारे तीन तास चाललेल्या या मोर्चाव्दारे विगन जीवनशैली आणि प्राण्यांच्या प्रति असलेली आपली पक्षपाती वागणूक यावरील संदेश लक्षवेधी ठरले. 

प्राणीमुक्ती मोर्चा आजपर्यंत आयोजित केलेल्या सर्व मोर्चांपेक्षा मोठा आणि आगळा वेगळा होता. प्राण्यांचे शोषण बंद व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी हातात संदेश फलक घेऊन जनजागृती केली. या मोर्चाच्या माध्यमातून भारतातील विगन चळवळ आणि विविध प्राणी हक्क व संवर्धन समुदायाच्या एकतेचे दर्शन घडले. प्राण्यांचे संरक्षण करणे हा मुख्य हेतू मोर्चामागील आहे. शाकाहारी होणे ही विचारपध्दती आहे. त्याचा दैनंदिन जीवनमानात प्रत्येकाने उपयोग करणे गरजेचे आहे. - आमजोर चंद्रन, संघटक व आयोजक अ‍ॅनिमल लिबरेशन मार्च

टॅग्स :PuneपुणेAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारagitationआंदोलन