शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप

By अतुल चिंचली | Updated: June 5, 2025 14:17 IST

सिंधुताईंच्या आश्रमातून फोन आल्याचे सांगत नोंदणी साठी पंधरा हजार रुपये फोन किंवा गुगल पे ने मागवले जातात, एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो

पुणे : सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत. असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे मॅसेज तयार करून ते व्हायरल केले जातात. आणि त्यानंतर समोरून व्यक्तीने फोन केल्यानंतर या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते. त्यानंतर नोंदणी साठी पंधरा हजार रुपये फोन पे किंवा गुगल पे ने मागवले जातात. एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो. किंवा फोन उचलला  जात नाही. दरम्यान अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर एका व्यक्तीने सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचला.

त्यानंतर ममता सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे. तुमच्याकडे मुलगी आहे का? अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकाराची शहानिशा केली. त्यावेळी देखील समोरून पंधरा हजार रुपयाची मागणी करण्यात आली. शिवाय सगळे डिटेल देखील मागण्यात आले. याबाबत त्यांच्याशी संवाद साधत ममता सपकाळ यांनी संताप व्यक्त केला आहे. माईंच्या कुठल्या संस्थेमध्ये ज्या माईंच्या मुलींच्या संस्था आहेत. तिथे पैसा घेतला जात नाही. एकही पैसा हा नवरा मुलाकडनं घेतला जात नाही. एका घरातनं जशी मुलगी सासरी जाते तशी आमच्या संस्थेतून जाते. आमचे सगळे हितचिंतक, आमचे सगळे पाठीराखे, आमचे आश्रयदाते आमचे देणगीदार हे सगळे त्यावेळेला आमच्या सोबत असतात. असे ममता  सपकाळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. 

पंधरा हजार भरा, दहा हजार भरा. बरं ज्यांनी पैसे भरलेत नंतर ते अ नंतर तो फोन बंद होणं. आणि लोकांची अशा प्रकारे दिशाभूल होणं हा प्रकारचं मुळात अतिशय संतापजनक आहे. अतिशय चीड आणणारा आहे. आणि या पद्धतीने लोकांचा गरीब लोक जे कोणी  तिथे पैसे भरत असेल ज्या कोणाच्या हतबलतेचा फायदा तिथे घेतला जातोय अतिशय वाईट आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की, कृपया प्रत्येकानी ह्या विषयाला मनावर घ्या हे कोण आहेत कुठे असतात ही लोकं शोधून काढा आणि हे थांबवा! असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान अशा प्रकारे लोकांची फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ममता सपकाळ यांनी पुणे पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली आहे.

अर्थात सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचं पाहून ममता सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली. तसेच सध्या सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी कुणीही मुलगी नाही. अशा प्रकारचा फोन आल्यास किंवा सोशल माध्यमातून माहिती मिळाल्यास नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. असं आवाहनही त्यांनी केलंय. 

टॅग्स :PuneपुणेSindhu Tai Sapkalसिंधुताई सपकाळmarriageलग्नfraudधोकेबाजीPoliceपोलिसMONEYपैसाSocial Mediaसोशल मीडिया