३१ डिसेंबरच्या रात्री गप्पा मारायला गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनी केला विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 15:33 IST2021-01-02T15:27:11+5:302021-01-02T15:33:49+5:30
याप्रकरणी पोलिसांनी ४९ वर्षाच्या वडिलांना केली अटक

३१ डिसेंबरच्या रात्री गप्पा मारायला गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनी केला विनयभंग
पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत सर्वत्र धुमधडाक्यात करण्यात आले. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने उत्साहावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. परंतू,पुणेकरांनी नियमांचे पालन करत आपल्याला आनंदाला वाट मोकळी करून दिली.पण याचदरम्यान ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हडपसर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री मैत्रिणीच्या घरी गप्पा मारण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनी विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ४९ वर्षाच्या वडिलांना अटक केली आहे.
याप्रकरणी १९ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मांजरीतील कमल पार्क सोसायटीतील मैत्रिणीकडे ३१ डिसेंबरच्या रात्री गप्पा मारण्यासाठी गेल्या होता. यावेळी मैत्रिणीच्या वडिलांनी फिर्यादीचा हात पकडून तिला जवळ ओढून जबरदस्तीने ओठाचा किस घेऊन विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.