The girl sucessfully searched by police who going assam | त्याने 'तिला' भुलवून थेट आसामला नेलं; पोलिसांनी जंगजंग पछाडून परत आणलं ..

त्याने 'तिला' भुलवून थेट आसामला नेलं; पोलिसांनी जंगजंग पछाडून परत आणलं ..

ठळक मुद्देकाकाला पाहताच ती गळ्यात पडून रडली

पुणे : आमचे चहाचे मळे आहेत, असे सांगून एका २२ वर्षाच्या तरुणीला त्याने भूलविले आणि आसामामध्ये पळून नेले़. एका सुखी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दृष्टीने हा धक्काच होता़. मुलीच्या आईकडून त्या मुलाचा नंबर घेतल्यावर तो थेट आसाममध्ये लोकेशन दाखवत होता़. लष्कर पोलिसांनी चिकाटीने थेट आसामाला जाऊन विविध अडचणीला तोंड देत या तरुणीला शोधून तिच्या पालकांच्या हवाली केले़. 
लष्कर भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील ही तरुणी काही दिवसांपूर्वी सायंकाळी अचानक घरातून निघून गेली़. तिच्या पालकांनी परिसरात, मित्रांकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने रात्री ते लष्कर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आले़. पोलिसांनी त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली़ तेव्हा या तरुणीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली़. मुलीच्या आईने तिच्याकडचे त्या मुलाचे फोननंबर पोलिसांना दिले़. त्यापैकी एक नंबर बंद होता तर दुसºया नंबरचे ठिकाणी पोलिसांनी शोधून काढले़, ते लोकेशन होते. थेट आसाममधील़ आता इतक्या लांबचे मोबाईल लोकेशन पोलिसांना मिळाले होते़. त्याशिवाय त्यांच्या हातात दुसरा कोणताही पुरावा नव्हता़. 
या एका धाग्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी पोलिसांना तिचा आसामात जाऊन शोध घेण्याचा आदेश दिला़. सहायक फौजदार भालचंद्र साबळे पाटील, पोलीस शिपाई आबासाहेब धावडे आणि महिला पोलीस शिपाई माधुरी काटकर हे तरुणीचा शोध घेण्यासाठी आसामला निघाले़. त्यांच्याबरोबर मुलीचा भाऊ आणि काकाही होते़. 
गुवाहाटी येथे पोहचल्यावर त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली़ आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केला़. आसाम येथील पोलीस अधिकारी चौधरी यांनी या पथकाबरोबर रायफलधारी पोलीस व उपनिरीक्षक मदतीला दिले़ पहिले दोन दिवस त्यांना काहीही माहिती हाती लागू शकली नाही़. मात्र, तिसऱ्या दिवशी गुवाहाटीपासून ४०० किमीवर असलेल्या एका गावात त्या मुलाचे लोकेशन आढळून आले़. पोलिसांचे पथक मजलदरमजल करीत दऱ्या डोंगरातून प्रवास करीत त्या गावात पोहचले़. तेव्हा त्यांना तिथे या मुलीचा शोध लागला़. मुलाबरोबर पळून आल्यानंतर तिला खरी वस्तूस्थिती लक्षात आली होती़. त्यामुळे आपण पळून आल्याचा तिला पश्चाताप झाला होता़ ती मला इथे राहायचे नाही असे म्हणत होती़. अखेर पोलिसांनी तिला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले़ आणि पुण्यात परत असून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले़. 
क्षणाच्या मोहाला बळी पडून जीवनाची दिशा चुकणाऱ्या एका तरुण मुलीला पोलिसांनी आपल्या चिकाटीने आणि कर्तव्यदक्षतेने पुन्हा एकदा नवे आयुष्य सुरु करण्याची संधी दिली़. 
............
खरे वास्तव आले पुढे 
या तरुणीला त्याने चांगलेच भुलविले होते़ हे पथक त्यांच्या गावात पोहचले, त्यांनी शोधत घराजवळ पोहचले़. लांबूनच या तरुणीने आपला काका आणि भावाला पाहताच धावत ती त्यांच्याकडे आली आणि रडत रडतच काकाच्या गळ्यात पडली़. मी चुकले़ मला येथून घेऊन चला असे सांगून लागली़. 
पुण्यातील ही तशी दुर्मिळ घटना पण, मिरा भाईंदर व अन्य राज्यातील अनेक मुलींना हे तरुण भुलवूुन लग्न करुन घरी आणतात़. काही दिवस त्यांच्याबरोबर राहतात़. तेथून बांगला देश केवळ १२ किमी अंतरावर आहे़. तेथील बड्या बागायतदार व इतरांना या मुलींची विक्री केली जात असल्याचे वास्तव स्थानिक पोलिसांनी सांगितले़. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The girl sucessfully searched by police who going assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.