लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 23:11 IST2018-11-14T23:11:08+5:302018-11-14T23:11:43+5:30
अल्पवयीन आरोपी : आईवडिलांना मारण्याची धमकी

लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर बलात्कार
लोणी काळभोर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मुलीच्या आईवडिलांना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत असून एका शाळेत शिक्षण घेत आहे. या मुलीची ओळख एका अल्पवयीन मुलाशी झाली होती. या मुलाने तू मला खूप आवडतेस, आपण लग्न करू, असे आश्वासन दिले होते.
या मुलाने १० आॅक्टोबरला कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एका ठिकाणी पीडित मुलीला भेटण्यासाठी बोलावले होते. त्या ठिकाणी या मुलाने पीडित मुलीची इच्छा नसताना बलात्कार केला होता. त्यानंतरही या मुलाने पीडित मुलीला या ठिकाणी बोलावून दोन वेळा बलात्कार केला होता. ही घटना कुणाला सांगितल्यास मुलीला व तिच्या आईवडिलांना जिवे मारण्याची धमकी या मुलाने दिली होती. त्यामुळे घाबरून जाऊन पीडित मुलीने ही घटना कुणालाही सांगितली नव्हती. मात्र नंतर त्रास होऊ लागल्याने घरच्यांच्या मदतीने तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.