मैत्रिणीला फ्लर्ट केल्याचा जाब विचारल्याने तरुणीचा पिरगळला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 07:15 PM2019-12-20T19:15:50+5:302019-12-20T19:21:06+5:30

हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत फ्लर्ट का करीत होतास, असा जाब तरुणीने मित्राला विचारला. त्याचा त्याला राग आला. त्यातून त्याने तरुणीचा हात जोरात पिरगळून गंभीर जखमी केले. वाकड, विशालनगर येथे 15 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.

girl molested due to ask her friend's flirt | मैत्रिणीला फ्लर्ट केल्याचा जाब विचारल्याने तरुणीचा पिरगळला हात

मैत्रिणीला फ्लर्ट केल्याचा जाब विचारल्याने तरुणीचा पिरगळला हात

Next

पिंपरी : हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत फ्लर्ट का करीत होतास, असा जाब तरुणीने मित्राला विचारला. त्याचा त्याला राग आला. त्यातून त्याने तरुणीचा हात जोरात पिरगळून गंभीर जखमी केले. वाकड, विशालनगर येथे 15 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकूलकुमार प्रदीपकुमार तेवतीया (वय 30, रा. विमाननगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तेवतीया हा फिर्यादी तरुणीचा मित्र आहे. ते दोघे चारचाकी वाहनाने कारने घरी जात होते. हॉटेलमध्ये मैत्रीणीला फ्लर्ट का करीत होतास, असे त्यावेळी फिर्यादी तरुणीने आरोपी तेवतीया याला विचारले. त्यामुळे आरोपी तेवतीया याला राग आला. त्यातून त्याने फिर्यादी तरुणीचा उजवा हात पिरगळून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: girl molested due to ask her friend's flirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.