भिगवण स्टेशन परिसरात बेशुद्धावस्थेत आढळली मुलगी; डोके, मानेवर खोल जखमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 18:41 IST2020-03-19T18:39:20+5:302020-03-19T18:41:02+5:30
अद्याप जखमी मुलीची ओळख पटली नसून ती परराज्यातील असल्याचा अंदाज..

भिगवण स्टेशन परिसरात बेशुद्धावस्थेत आढळली मुलगी; डोके, मानेवर खोल जखमा
भिगवण : भिगवण रेल्वे स्टेशन परिसरातील शेतात १५ वर्षीय मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. या मुलीच्या डोक्याला तसेच मानेवर खोल जखमा आढळून आल्या आहे. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता भिगवण पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. भिगवण रेल्वे स्टेशन परिसरातील ही घटना आहे. अद्याप जखमी मुलीची ओळख पटली नसून ती परराज्यातील असल्याचा अंदाज आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण आणि डिकसळगावच्या मध्यवर्ती असणाऱ्या मक्याच्या शेतात मुलगी बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्यात मिळाली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांना तिच्या डोक्याला आणि मानेवर खोल जखमा आढळून आल्या. या मुलीची उशिरापर्यंत ओळख पटली नसून तिला पोलिसांनी भिगवण येथील खासगी हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. प्राथमिकउपचार झाल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी शासनाच्या १०८ गाडीने ससून येथे पाठविण्यात आले. मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला होता की इतर काही कारणामुळे तिला जीवे मारण्याच्या उदेशाने या ठिकाणी टाकले याबाबत भिगवण पोलीस तपास करत असून याबाबत उशिरापर्यंत कोणतीही माहिती पोलीस प्रशासनाने दिलेली नाही.