शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक बस मार्गावर आणणार

By admin | Updated: April 17, 2017 06:29 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या असलेल्यापैकी किमान ९०० बस येत्या ३० एप्रिलपर्यंत मार्गावर आणण्याच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने तयार सुरू केली आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या असलेल्यापैकी किमान ९०० बस येत्या ३० एप्रिलपर्यंत मार्गावर आणण्याच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने तयार सुरू केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्रपाळीचे काम दिल्यानंतर आता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांनासुद्धा जागते राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकारी देखील आता काही काळासाठी डेपोंमध्ये राहणार असून, तेथील कामाचा आढावा घेणार आहेत.पीएमपीच्या मालकीच्या १२०० बस असून, त्यापैकी सुमारे दररोज ७०० ते ७५० बस मार्गावर असतात़ पीएमपी प्रशासनाने १६ ते ३० एप्रिल दरम्यान विशेष मोहीम हाती घेतली असून, या काळात मालकीच्या किमान ९०० बस मार्गावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे महाव्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक, मुख्य अभियंता, कामगार अभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, झोनल व्यवस्थापक यांनी आठवड्यातून एकदा आणि आगार व्यवस्थापक व यांत्रिकी अभियंत्याने किमान दोनदा डेपोंना रात्री ११ ते १ दरम्यान भेट द्यावी. सर्व डीएमई, डेपो इंजिनियर यांनी डेपोत रात्रपाळी ८ ते ४ किंवा १० ते ६ या वेळेत करावी आणि बसेसची देखभाल दुरुस्ती करून जास्तीत जास्त गाड्या मार्गस्थ कराव्यात, असेही आदेश आहेत.