शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंडपांसाठी परवानगी घ्या!

By admin | Updated: September 14, 2015 04:50 IST

गणेशोत्सव, ईद, दहीहंडी, नवरात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता रस्त्यांवर मंडप टाकायचा असेल तर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.

दीपक जाधव, पुणेगणेशोत्सव, ईद, दहीहंडी, नवरात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता रस्त्यांवर मंडप टाकायचा असेल तर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांतील आकडेवारीनुसार वर्षाला केवळ ८५ ते ९० मंडळांकडून परवानगी घेतली जात असल्याचे माहिती अधिकारामध्ये उजेडात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदा नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याने मंडळांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.उत्सवाच्या काळांमध्ये रस्त्यावर बेकायदेशीरपणे व नियमांचे पालन न करता उभारल्या जाणाऱ्या मंडपांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने मंडप उभारण्याबाबत काटेकोर नियमावली ठरवून देण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. पुणे महापालिकांकडून त्यानुसार नियमावली तयार करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तोपर्यंत यंदा गणेश मंडळांना जुन्या नियमावलीनुसार परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, जुन्या नियमावलीनुसार मंडपांसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगीच घेतली जात नसल्याचे उजेडात आले आहे. शहरामध्ये शेकडो गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मंडळे आहेत. त्याचबरोबर ईद, दहीहंडी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या सर्व कार्यक्रमांसाठी रस्त्यावरच मंडप उभारले जातात. मात्र, त्यातील बहुतांश मंडळे परवानगीच घेतली जात नसल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. रस्त्यांवर मंडप टाकण्यासाठी २००९ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीमध्ये किती जणांनी परवानगी घेतली याची माहिती लोकहित फाऊंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी मागितली होती. त्यामध्ये गेल्या ७ वर्षांत केवळ ४८० जणांनी मंडप टाकण्यासाठी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. २००१ मध्ये ९०, २०१२ मध्ये ६०, २०१३ मध्ये ८०, २०१४ मध्ये ८८, २०१५ (आॅगस्टपर्यंत) ४७ मंडळे, संस्थांनी परवानगी घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. उच्च न्यायालयाने रस्त्याच्या किमान एक तृतीयांश जागेवरच मंडप उभारण्यात यावा, आठ फूट किंवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर मंडप उभारू नयेत, मंडप उभारताना वाहतूक विभाग, पोलीस ठाणे, अग्निशमन विभाग यांची परवानगी घ्यावी, महावितरणकडून रीतसर परवानगी घेऊनच वीजजोड घ्यावे, असे निर्देश दिले आहेत.