GBS outbreak: जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:54 IST2025-02-12T09:53:40+5:302025-02-12T09:54:14+5:30
शहरासह जिल्ह्यातील काही भागांत जीबीएस आजाराने आरोग्य विभागाची झोप उडविली

GBS outbreak: जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७
पुणे : गुईलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) नव्याने पाच रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णसंख्या १९७ वर पोहोचली आहे. त्यात मंगळवारी दिवसभरात १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, ५० रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरासह जिल्ह्यातील काही भागांत जीबीएस आजाराने आरोग्य विभागाची झोप उडविली आहे.
आजही दररोज चार ते पाच बाधित सापडत असून, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्यांची संख्याही दररोज कमी-अधिक होत आहे. दरम्यान, पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहे.
शहर आणि जिल्ह्यात १९७ संशयित जीबीएस बाधित रुग्णांपैकी १७२ रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. त्यामध्ये सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये ४० रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या ९२ ही समाविष्ट गावांतील आहे. २९ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २८ रुग्ण पुणे ग्रामीण, तर ८ रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत.