शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

GBS : 'पाणीपुरी खाल्ल्यानंतर ‘GBS’ झाला अन् काही दिवसातच तरुणीने जीव...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:07 IST

पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली होती. मात्र

बारामती -  जीबीएस सिंड्रोम आजाराची लागण झालेल्या बारामतीच्या युवतीने अखेर मंगळवारी(दि १८) शेवटचा श्वास घेतला. किरण राजेंद्र देशमुख (वय २६) असे या युवतीचे नाव आहे. गेल्या २३ दिवसांपासून तिच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होेते. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती.किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. सिंहगड परिसरात किरणने तीन आठवड्यापूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. २३ जानेवारीला किरण हि बारामती येथील तिच्या घरी आली होती. यावेळी तिला अन्न गिळण्यास त्रास जाणवू लागला.त्यानंतर बारामती शहरातील डाॅक्टरांकडे सुरवातीला उपचार घेण्यात आले.मात्र,त्यानंतर जीबी सिंड्रोम सदृश्य लक्षणे आढळल्याने तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.दरम्यान ‘एनआयव्ही’ च्या तपासणीत तिला जीबी सिंड्रोम ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पुण्यात तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र तिची प्रकृती खालावत गेली आणि आज तिचे निधन झाले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.बारामतीत एकही जीबी सिंड्रोमचा रुग्ण नसल्याचे देखील डाॅ.खोमणे यांनी स्पष्ट केले.किरणची आर्थिक परिस्थिती  हलाखीची आहे.तिचे वडील रीक्षाचालक आहेत.काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आल्यावर त्यांना तिच्यावर पुण्यात सुरु असलेल्या उपचारांबाबत माहिती देण्यात आली होती.तेव्हा देशमुख यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत अजित पवार यांनी किरणला नवले हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्याचे नियोजन केले.त्या ठीकाणी तिच्यावर उपचार सुरु होते,अशी माहिती स`थानिक नगरसेवक,माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांनी दिली.किरण देशमुख हिने पुण्यात राहुन ‘एमसीए’ हि पदवी मिळवत शिक्षण पुर्ण केले होते.शिक्षण पुर्ण केल्यानंतर ती नोकरीच्या शोधात होती.मात्र,याच दरम्यान जीबीएस सिंड्रोमने तिचा बळी घेतला.त्यामुळे बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे.किरण हिच्यावर जळोची येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामती शहरात फेब्रुवारीच्या पहिल्या महिल्यात ६५ वर्षीय रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लागण झाली होती.मात्र,एनआयव्ही कडे केलेल्या तपासणीत या ज्येष्ठाला जीबी सिंड्रोम आजार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे,असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणdoctorडॉक्टरAjit Pawarअजित पवारEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र