शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:13 IST

या ऐतिहासिक बदलावर विरोधकांनी महात्मा गांधींचे नाव हटवल्याचा आरोप करत जोरदार गदारोळ केला. याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले.

'मनरेगा' योजनेच्या जागी आणण्यात आलेलेल 'विकास भारत - रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण)' अर्थात 'व्हीबी-जी राम जी' विधेयक २०२५ प्रदीर्घ चर्चेनंतर आज लोकसभेत मंजूर करण्यात आले. या ऐतिहासिक बदलावर विरोधकांनी महात्मा गांधींचे नाव हटवल्याचा आरोप करत जोरदार गदारोळ केला. याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले.

सभागृहात विरोधकांना उत्तर देताना शिवराज सिंह म्हणाले, ""गांधीजींच्या नावावर आदळआपट करणाऱ्या काँग्रेसला हे माहीत असायला हवे की, गांधीजी असेही म्हणाले होते की, आता स्वातंत्र मिळाले आहे, काँग्रेस विसर्जित करायला हवी. काँग्रेसच्या ऐवजी लोक सेवक संघ तयार करायला हवा. मात्र, केवळ सत्तेला चिगटून बसण्यासाठी आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा लाभ घेण्यासाठी नेहरूंनी काँग्रेस विसर्जित केली नाही."

शिवराज सिंह पुढे म्हणाले, काँग्रेसने बापूंच्या आदर्शांची हत्या त्याच दिवशी केली, ज्या दिवशी काँग्रेस विसर्जित केली नाही, ज्या दिवशी देशाची फाळणी स्वीकारली गेली आणि आणीबाणी लादली गेली."

का आणावा लागला नवीन कायदा? नवीन विधेयकाची आवश्यकता, स्पष्ट करताना चौहान यांनी जुन्या 'मनरेगा'मधील त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले, मनरेगा योजना पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली होती. राज्यांमध्ये निधीचे वाटप असमान होते. मजुरीसाठी ६० टक्के आणि साहित्यासाठी ४० टक्के निधीचा नियम असताना, साहित्यावर प्रत्यक्षात केवळ २६ टक्केच खर्च झाला. या तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी दूर करण्यासाठीच हे नवीन पाऊल उचलण्यात आले आहे.

आता या नविन विधेयकानुसार, ग्रामीण कुटुंबांना १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देणार आली आहे. यामुळे गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress should dissolve now: New law needed? Shivraj Singh clarifies.

Web Summary : Lok Sabha passed 'VB-G Ram Ji' bill replacing 'MNREGA', sparking uproar. Shivraj Singh criticized Congress for not dissolving as Gandhi wished, accusing them of corruption in MNREGA. The new bill guarantees 125 days of rural employment, aiming for comprehensive village development.
टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाcongressकाँग्रेस