शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यातील नीरामध्ये जी.बी.एस. सदृश्य रुग्ण आढळला; आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:47 IST

रुग्णाला अशक्तपणा, हात-पायाला मुंग्या येणे, अंगात शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येत होती

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ५१ वर्षीय व्यक्तीमध्ये जी.बी.एस. (गिलियन-बारे सिंड्रोम) या आजाराच्या निदानाशी सुसंगत अहवाल आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संबंधित रुग्णावर सध्या पुणे येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू असून नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 

 सदर व्यक्ती गेल्या सहा दिवसांपासून नीरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. अशक्तपणा, हात-पायाला मुंग्या येणे, अंगात शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येत होती. खाजगी डॉक्टरांनी महागडी इंजेक्शने देत उपचार केले; मात्र दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास वाढल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले. विविध वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर जी.बी.एस. या आजाराच्या निदानाशी सुसंगत असा अहवाल प्राप्त झाला. 

 या संदर्भात पुरंदर तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी सांगितले की, संबंधित रुग्णामध्ये जी.बी.एस. सदृश्य लक्षणे आढळली असून अहवालाने त्यास दुजोरा दिला आहे. हा आजार संसर्गजन्य नसून प्रामुख्याने दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणाऱ्या संसर्गानंतर शरीराच्या प्रतिकारशक्तीतील बिघाडामुळे उद्भवू शकतो. योग्य वेळी उपचार मिळाल्यास हा आजार तात्पुरता असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. आरोग्य विभागाकडून परिसरात जनजागृती, पाणी व स्वच्छतेबाबत सूचना, तसेच लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, स्वच्छ पाणी पिणे, अन्नाची स्वच्छता राखणे आणि अशक्तपणा, मुंग्या येणे, श्वसनाचा त्रास अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. काळे यांनी केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : GBS-like case in Purandar's Neera; health system on alert.

Web Summary : A GBS-like case surfaced in Neera, Purandar Taluka. Health officials are on alert, implementing preventive measures. The patient is undergoing treatment in Pune. Symptoms include weakness, numbness, and breathing issues. Public awareness campaigns are underway, emphasizing clean water and hygiene.
टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSenior Citizenज्येष्ठ नागरिक