शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

GBS संसर्गजन्य रोग नाही मात्र याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:08 IST

गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम आजाराबाबत नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

पुणे : शहरात आणि जिल्ह्यात गुईवेल बॅलेन्स सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (एनआयव्ही) येथे पाठवण्यात आले आहेत. या दुर्मिळ आजाराबाबत पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभाग दक्षता बाळगत आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मांजरी येथे बोलतांना गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम या आजाराबाबत भाष्य केले. ते म्हणाले,' GBS सिंड्रोम या आजाराचा आढावा घेतला हा संसर्गजन्य रोग नाही. याबाबत पुणे जिल्ह्यातील कलेक्टर, सीईओ आणि  आधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहे. याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. याबाबत नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जी संख्या ३० होती ती आत्ता ५९ वर गेली आहे. बहुतेक लोक हे पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत."दरम्यान, आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचे रुग्ण पुणे शहरातील 6 आणि उर्वरित जिल्ह्यातील आहेत. हे रुग्ण उपचारासाठी पुण्यात दाखल झाले असून, हा आजार संसर्गजन्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम म्हणजे काय?हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो एक लाख लोकांपैकी एका व्यक्तीत आढळतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लस घेतल्यानंतर किंवा एच1एन1 लस घेतल्यानंतर काही प्रकरणांमध्ये हा आजार होऊ शकतो. याचे निदान करण्यासाठी स्पायनल फ्लूडची चाचणी केली जाते. उपचारासाठी प्लाझ्मा एक्सचेंजसारख्या पद्धतींचा वापर केला जातो. हा आजार दुर्मिळ असला तरी घाबरण्यासारखा नाही, असे तज्ज्ञ सांगतात.महापालिका आणि आरोग्य विभागाची कारवाईएनआयव्हीकडून रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या टीम दाखल होणार आहेत. तसेच, ज्या हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते, त्या परिसरातील इतर रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे. महापालिकेने या रुग्णांची सखोल तपासणी सुरू केली असून, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. या दुर्मिळ आजारावर उपचार उपलब्ध असून, तो संसर्गजन्य नाही, हे विशेष आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यWaterपाणीHealth Tipsहेल्थ टिप्सMahayutiमहायुती