GBS Disease : महापालिकेला तातडीने हवेत न्यूराेलाॅजिस्ट..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:20 IST2025-01-29T12:19:20+5:302025-01-29T12:20:00+5:30

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर उपचार केले जाणार

GBS Disease Municipal Corporation urgently needs a neurologist | GBS Disease : महापालिकेला तातडीने हवेत न्यूराेलाॅजिस्ट..!

GBS Disease : महापालिकेला तातडीने हवेत न्यूराेलाॅजिस्ट..!

पुणे : महापालिकेला गुइलेन बॅरे सिंड्राेम (जीबीएस) या आजारावर उपचार करण्यासाठी महापालिकेकडे न्यूराेलाॅजिस्ट (मेंदू विकार तज्ज्ञ) उपलब्ध नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तज्ज्ञ डाॅक्टरांचा शोध सुरू असून महापालिकेला सध्या तीन डाॅक्टरांची आवश्यकता आहे.

शहरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले आणि आराेग्यप्रमुख डाॅ. नीना बाेराडे यांनी महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाय याेजनांची माहिती दिली. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी महापािलकेला तीन न्यूराेलाॅजिस्ट हवे आहेत. ज्या खासगी रुग्णालयात न्यूरोलोजिस्ट प्रॅक्टिस करतात त्यांना महापालिकेला सेवा देण्याची मागणी केली आहे. या आजार संसर्गजन्य नसुन, गेल्यावर्षी शहरात या आजाराचे ५० ते ५५ रुग्ण आढळले होते.

सध्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रत्येक हॉस्पिटलसाठी नोडल ऑफिसर नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून नवीन व जुने रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे. शहरी गरीब याेजनेंतर्गत १३ जानेवारीपासून आढळलेल्या रुग्णांना उपचार दिले जाणार आहेत. जे रुग्ण या योजनेत बसत नाहीत, त्यांना एक लाख रुपये सवलत दिली जाणार आहे. बाधित क्षेत्रातील लोकांना तीन लाखांपर्यंत मदत केली जाणार आहे. परिस्थितीनुसार इतर भागांतील रुग्णांवर सवलतीचा निर्णय घेतला जाईल.

बाधित परिसराचा ८५ पथकांनी सर्वे केला असून माहिती संकलित करण्यासह जनजागृतीचे काम केले जात आहे. तूर्तास नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी हाेत आहे. केंद्रीय टीम जॉइन झाली असून, रुग्णांच्या घरचा पुन्हा तपशीलवार सर्व्हे केला जाणार आहे. बाधित क्षेत्रातील पाण्याचे नमुने घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हाऊस टू हाऊस शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी मेडिक्लोरअर बॉटल ६०० वाटप केले. राज्य शासनाच्या सूचनांनुसार काम सुरू असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टाेल फ्री क्रमांक सुरू

जीबीएस आजाराबाबतच्या अडचणींसंदर्भात महापालिकेकडून 020 - 25506800, 25501269, 67801500. हे टोल फ्री नंबर सुरू केले आहेत.

Web Title: GBS Disease Municipal Corporation urgently needs a neurologist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.