शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावडेवाडी सरपंंचपदी छाया गावडे

By admin | Updated: August 22, 2015 01:59 IST

आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव)च्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या छाया आनंदराव गावडे सरपंचपदी व उपसरपंचपदी लता दत्तात्रय जारकड

अवसरी : आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव)च्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या छाया आनंदराव गावडे सरपंचपदी व उपसरपंचपदी लता दत्तात्रय जारकड यांना प्रत्येकी ६ मते पडल्याने गावडेवाडी गावात पुन्हा एकदा भगवा फडकला.सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी सकाळी पार पडली. या वेळी सरपंचपदासाठी तीन अर्ज आणि उपसरपंचपदासाठीही ३ अर्ज आले. त्यानंतर प्रत्येकी एकाने माघार घेतली. शिवसेनेच्या वतीने सरपंचपदासाठी छाया आनंदराव गावडे आणि राष्ट्रवादीतर्फे सविता राजेंद्र गावडे यांच्यात मतदान होऊन ११ पैकी ६ मते छाया गावडे यांना पडल्याने छाया गावडे यांची सरपंचपदी निवड झाली. उपसरपंचपदासाठी शिवसेनेच्या वतीने लता दत्तात्रय जारकड व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब चिमाजी गावडे यांच्यात मतदान होऊन लता जारकड यांना ६ मते मिळून त्यांची उपसरपंचपदी निवड झाली.नवनिर्वाचित शिवसेनेचे सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार माजी सरपंच देवराम गावडे, संतोष गावडे, शाखाप्रमुख विजय गावडे, सुरेश तळेकर, विकास गावडे, रामचंद्र गावडे यांनी शाल व श्रीफळ देऊन केला. मतदानाप्रसंगी केरभाऊ गावडे, मयूर शिंदे, आशा तळेकर, संतोष गावडे, बाबाजी टेमकर, बाळासाहेब गावडे, ज्योती जारकड, सविता गावडे, वनिता गावडे यांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. डी. भोर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तलाठी एस. एस. गायकवाड, ग्रामसेविका ए. एम. पाटोळे यांनी काम पाहिले. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)