शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शेगडी जमिनीवर ठेवून स्वयंपाक करणे घातक  : कविता टिक्कू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 1:47 PM

शेगडी गॅस सिलिंडरच्या उंचीपेक्षा थोडी वर हवी

पुणे : शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी जमिनीवर गॅस शेगडी ठेवून स्वयंपाक करण्याची पद्धत सर्रास वापरली जाते. तसेच, गॅस संपल्यानंतर सिलिंडर गरम पाण्यात ठेवणे अथवा सिलिंडर आडवा करूनही वापरला जातो. मात्र, या गोष्टी अपघाताला निमंत्रण ठरू शकतात. त्या टाळाव्यात, असे आवाहन इंडियन आॅईल कॉर्पोरेशनच्या उप महाव्यवस्थापक कविता टिक्कू यांनी केले आहे. गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापरासाठी ऑईल कंपन्यांच्या वतीने देशभर सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. गॅस सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी गॅसचे वजन आणि गॅसमधून गळती होते की नाही, हेदेखील तपासण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. यापुढे गॅस वितरण कर्मचाऱ्यासोबत गॅसचे वजन दर्शविण्याचा काटा आणि गळती शोधण्याचे उपकरणदेखील असेल. त्याबाबत ऑईल कंपन्यांनी जागृती मोहीम हाती घेतली आहे. याबाबत माहिती देताना टिक्कू म्हणाल्या, ‘‘एलपीजी गॅस हा स्वयंपाकासाठी अत्यंत उपयुक्त असला, तरी तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेची काळजी गॅस सिलिंडर स्वीकारण्यापूर्वीच केली पाहिजे. सिलिंडरच्या वजनापासून ते गळतीबाबतची माहिती जाणून घेणे ग्राहकाचा अधिकार आहे. तसेच, गॅसचा वापर करतानादेखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. गॅस शेगडी ही गॅस सलिंडरच्या उंचीपेक्षा वर असली पाहिजे.’’किचन ओट्याखाली गॅस ठेवल्यास तो, फर्निचरने झाकून बंदिस्त करू नये. अनेकदा गॅस शेगडी खाली ठेवून स्वयंपाक केला जातो. अशी पद्धत अत्यंत घातक आहे. एलपीजी गॅस हवेपेक्षा जड असतो. गॅस शेगडी सिलिंडरच्या उंचीपेक्षा खाली असल्यास गॅसचा एकसमान पुरवठा होत नाही. त्यामुळे अपघात संभवू शकतो. त्यामुळे फरशीवर स्वयंपाक करणे टाळावे. जेथे स्वयंपाक ओटा नसेल त्यांनी तशा पद्धतीने ओटा करून घेतला पाहिजे. तसेच, अनेकदा गॅस संपल्यानंतर गरम पाण्यत गॅस सिलिंडर ठेवून त्याचा वापर केला जातो अथवा सिलिंडर तिरका किंवा आडवा करून वापरणेदेखील घातकच असल्याचे टिक्कू यांनी स्पष्ट केले..........तुम्हाला हे माहिती आहे काय ?स्वयंपाकाच्या गॅसचे वजन १४.२ किलो आणि रिकाम्या गॅस सिलिंडरचे वजन १५.५ किलोंदरम्यान असते. साधारण भरलेल्या सिलिंडरचे वजन २९.७ किलोग्रॅम भरले पाहिजे. यात शंभर ग्रॅमपर्यंत वजन कमी-अधिक असल्यास सामान्य मानले जातेएलपीजीमधे मकॅप्टन या द्रवपदार्थाचे काहीसे मिश्रण असते. या द्रवाला दुर्गंधी असल्यानेच गॅस गळती झाल्यावर ती लक्षात येते.एलपीजी गॅसचा एक लिक्विड थेंब अडीचशे पट प्रसरण पावतो. म्हणजेच एक थेंब घरात सांडल्यास तो अडीचशे थेंबांच्या आकाराचा गॅसव्हेपर तयार करू शकतो...........

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरfoodअन्नWomenमहिलाhotelहॉटेल