गॅस तुटवडा! पुणे मार्केटयार्डातील शेतकऱ्यांची भूक चहा बिस्किटांवर; उपहारगृह पडली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 20:49 IST2026-03-17T20:49:00+5:302026-03-17T20:49:29+5:30

बाजार आवारातील उपहारगृह चालकांना प्रशासनाने सिलिंडर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे

Gas shortage! Farmers in Pune market yard hungry for tea and biscuits; restaurant closed | गॅस तुटवडा! पुणे मार्केटयार्डातील शेतकऱ्यांची भूक चहा बिस्किटांवर; उपहारगृह पडली बंद

गॅस तुटवडा! पुणे मार्केटयार्डातील शेतकऱ्यांची भूक चहा बिस्किटांवर; उपहारगृह पडली बंद

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना चहा बिस्किटांवर भूक भागवावी लागत आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे बाजार आवारातील उपहारगृह बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार आवारातील उपहारगृह चालकांना प्रशासनाने सिलिंडर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच पुरवठा केला जाईल असे ही बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांनी सांगितले.

मार्केटयार्डातील श्री शारदा गजानन मंडळाकडून शेतकऱ्यांना विनामूल्य भोजन उपलब्ध करून दिले जाते. बाजार आवारातील अन्य घटकांकडून भोजनासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. गॅस तुटवड्यामुळे सध्या हा उपक्रम बंद करण्यात आला आहे. बाजार आवारात शेतमाल घेऊन येणारे शेतकरी उपाहारगृहात जेवण करतात. बाजार आवाराच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्या आहेत. गॅस तुटवड्यामुळे बाजार आवारातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत. परगावाहून आलेले शेतकरी चहा आणि बिस्किटे खाऊन भूक भागवावी लागत आहे. तसेच आवक वाढल्यानंतर शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

गॅस तुटवड्यामुळे खाद्यपदार्थ तयार करणे अवघड झाले आहे. बाजार आवारातील शेतकरी, कामगारांसह बाजार आवारातील सर्वांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने प्रशासनाशी संपर्क साधून गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास उपासमारीची वेळ येणार नाही,’ - राजेंद्र चोरघे, उपहारगृह चालक

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराचा समावेश अत्यावश्यक सेवेत होतो. शेतकरी परगावाहून शेतमाल घेऊन बाजार आवारात येतात. बाजार आवारातील उपहारगृह चालकांना प्रशासनाने सिलिंडर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. - प्रकाश जगताप, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Gas shortage! Farmers in Pune market yard hungry for tea and biscuits; restaurant closed