शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कचराप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईच्या तयारीत

By admin | Updated: October 29, 2015 00:09 IST

कचराप्रश्नावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पालिकेला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत; मात्र त्याची पालिका दखल घेत नसल्याने एमपीसीबीने फौजदारी कारवाई करण्याचा

पुणे : कचराप्रश्नावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पालिकेला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत; मात्र त्याची पालिका दखल घेत नसल्याने एमपीसीबीने फौजदारी कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. यासाठी एमपीसीबीने न्यायाधीकरणाकडे पाच दिवसांचा कालावधी मागितला आहे.न्यायमूर्ती व्ही. एस. किनगावकर आणि न्यायमूर्ती अजय देशपांडे यांच्या न्यायाधीकरणासमोर सुनावणी झाली. एमपीसीबीच्या वतीने पालिकेला वारंवार कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, पालिकेने त्याला समाधानकारक उत्तरे दिली नाही. एमपीसीबीने पाच दिवसांत कारवाई करू, असे उत्तर दिले. न्यायाधीकरणाने एमपीसीबीने पालिकेला किती नोटिसा बजावल्या व काय कारवाई केली याबाबतचा तक्ताच पुढील सुनावणीवेळी करण्यास सांगितले आहे. याबाबतची हकीकत अशी, हंजरला कचरा व्यवस्थापनासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले होते. परंतु, हंजर तेथे कमी पडल्याचे पालिकेनी न्यायाधिकरणात सांगितले. त्याच बरोबर मागील वेळी तुळापूर, वढू येथील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. जवळच संभाजी महाराजांची समाधी असल्याने तेथील गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध करून आंदोलन केल्याचे न्यायाधीकरणात सांगितले.