१५ वर्षांपासून साठलेला कचरा गोळा केला; तब्बल १११ टन कचऱ्याचे संकलन, तळजाईवर स्वच्छता मोहीम

By अजित घस्ते | Updated: March 31, 2025 18:13 IST2025-03-31T18:12:13+5:302025-03-31T18:13:57+5:30

वनविभागाच्या अंतर्गत टेकडीच्या कडेला असलेल्या परिसरात एवढा कचरा असताना याकडे दुर्लक्ष होत आहे

Garbage accumulated for 15 years collected 111 tons of garbage collected cleanliness drive at Taljai | १५ वर्षांपासून साठलेला कचरा गोळा केला; तब्बल १११ टन कचऱ्याचे संकलन, तळजाईवर स्वच्छता मोहीम

१५ वर्षांपासून साठलेला कचरा गोळा केला; तब्बल १११ टन कचऱ्याचे संकलन, तळजाईवर स्वच्छता मोहीम

पुणे: डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सकाळी तळजाई टेकडीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून यामध्ये जवळपास १५ वर्षापासूनचा साठलेला कचरा गोळा करून जवळपास १११.५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रतिष्ठानचे पुणे शहरातून १ हजार ६८५ सदस्य सहभागी झाले होते. यावेळी आमदार भिमराव तापकीर,धनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे, मनपा वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे, प्रमोद ढसाळ, धनराज नवले, वनरक्षक रोहिणी घाडगे,वनपाल विद्याधर गांधीले, माजी नगरसेवक वर्षा तापकीर,विष्णु हरिहर,बाळासाहेब धनकवडे,महेश वाबळे,रघुनाथ गौडा आदी उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेमध्ये १५ वर्षापुर्वीचा १११ टन कचऱ्याचे संकलन : स्वच्छता मोहिमेमध्ये १११ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यामध्ये ओला कचरा ३१ टन तर सुका कचरा ८०.५ टन कचरा संकलित करण्यात आले. तर जवळपास तळजाई टेकडी वन विभागाच्याकडेला असलेली वस्ती, सोसायटी कडेचा परिसरातील ३३९०४३ स्क्वेअर मीटर तळजाई टेकडीचा परिसर स्वच्छ करण्यात केला.

वनविभागाचे याकडे दुर्लक्ष 

वनविभागाच्या अंतर्गत टेकडीच्या कडेला असलेल्या परिसरात एवढा कचरा असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. यामध्ये १११ टन कचरा निघत असेल तर पर्यावरणाचा -हास होत आहे. तर स्वच्छा नसल्याने आणि झाडीची देखभाल होत नसल्याने याठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत आहे.

तळजाई टेकडी परिसराच्या कडेला असलेल्या वस्ती, सोसायटी मधील नागरिकांनी टाकेला जवळपास १११ टन कचरा सोमवारी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व मनाच्या वतीने संकलन करण्यात आले. यामध्ये मनपाच्या ४ मोठया कंटेनरच्या ६ फे-या तर ८ लहान गाड्या व ६ छोटा हत्ती टेम्पोच्या साहाय्याने कचरा उचलला गेला. मनपाचे २४ कर्चचारी सहभागी होवून स्वच्छा करण्यात आली. - विक्रम काथवटे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक

 

Web Title: Garbage accumulated for 15 years collected 111 tons of garbage collected cleanliness drive at Taljai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.