पुण्यातील उत्तमनगर येथे गॅरेजला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 15:19 IST2021-08-08T15:18:50+5:302021-08-08T15:19:49+5:30
दोघाही कामगारांना त्वरित दवाखान्यात नेण्यात आले. परंतु एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

पुण्यातील उत्तमनगर येथे गॅरेजला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू
शिवणे : उत्तमनगर येथील कोपरे गावात काल रात्री शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या भीषण आगीत गॅरेजमध्ये काम करणाऱ्या ब्रिजेश सहानी ( वय २० वर्षे ) कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर संजय सहानी (वय ३६ वर्षे ) हा देखील ह्या आगीत भाजल्याने जखमी झाला आहे.
काल रात्री बारा, एकच्या सुमारास आग लागली होती. गॅरेजमधील २ मोठ्या बसेस जळून खाक झाल्या असून १ गाडी किरकोळ जळाली आहे. आग लागल्यावर दोघाही कामगारांना त्वरित दवाखान्यात नेण्यात आले. परंतु एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.
कोपरे येथील गॅरेज मध्ये गाडीच्या दुरुस्तीची तसेच पेंटिंग ची कामे केली जातात. ह्या गॅरेज मध्ये कामासाठी नेहमीच बऱ्याच गाड्या उभ्या असतात. अपघातावेळी देखील तेथे अजूनही गाडया उभ्या होत्या. परंतु त्यातील काही गाड्या बाहेर काढण्यात यश आले होते. आग एवढी प्रचंड होती की अग्निशामक दलाच्या ५ गाड्याना आग विझवण्यासाठी १ ते १.३० तास कसरत करावी लागली. गॅरेज मध्ये असलेल्या थिनरच्या बॅरेल मुळे आग जास्त भडकली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने मिळाली.