गुंगीकारक स्पे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

By विवेक भुसे | Updated: October 13, 2022 12:45 IST2022-10-13T12:42:14+5:302022-10-13T12:45:10+5:30

तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे...

Gang-rape of woman with spraying on face Shocking incident kondhava in Pune | गुंगीकारक स्पे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

गुंगीकारक स्पे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : महिलेच्या तोंडावर गुंगीकारक स्प्रे मारुन ती बेशुद्ध झाली असताना तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक केली आहे.

राकेश सतीश आढाव (वय ३२, रा. विमाननगर), मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्वउद्दीन (रा. औरंगाबाद), मोहम्मद शरीफनवाज सर्वरुद्दीन (वय २८, रा. औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३७ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार उंड्री येथील एका सोसायटीत ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ११ ऑक्टोबर सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उंड्री येथील एका सोसायटीत रुम शेअर करुन राहत आहेत. त्या आपल्या रुममध्ये झोपल्या असताना त्यांच्या तिघांपैकी एका रुममेटने त्यांच्या तोंडावर गुंगीकारक स्प्रे मारला. त्यामुळे त्यांची शुद्ध हरपली. त्यानंतर या तिघांनी त्या बेशुद्ध असताना त्यांच्यावर बलात्कार केला. त्या तब्बल दीड दिवसांनी शुद्धीवर आल्या. त्यानंतर आपल्याबरोबर या तिघांनी काय केले, याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली़. पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

Web Title: Gang-rape of woman with spraying on face Shocking incident kondhava in Pune