शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अंगावर घाण टाकून पैसे लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 21:57 IST

वाहनाजवळ नोटा टाकणे, वाहनांची काच फोडणे, टायर पंक्चर करणे, मोटारसायकलची डिक्की फोडणे अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश मुंढवा पोलिसांनी केला असून १४ जणांना अटक केली आहे़.

ठळक मुद्दे१३ गुन्हे उघड : साडेचार लाखांचा माल जप्त पकडण्यात आलेले हे सर्व माधव गोगला टोळीतील

पुणे : अंगावर खुजली पावडर, घाण, वाहनाजवळ नोटा टाकणे, वाहनांची काच फोडणे, टायर पंक्चर करणे, मोटारसायकलची डिक्की फोडणे अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश मुंढवा पोलिसांनी केला असून १४ जणांना अटक केली आहे़. त्यांच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून ७ रेसर मोटारसायकली, १४ मोबाईल फोन, कोयते, सुरा, चॉपर, कटावणी, गलोर व लोखंडी धातूच्या गोळ्या, टोच्या, मिर्ची पावडर, खुजली पावडर, बिस्किट पुडे असा ४ लाख ४६ हजार ४४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़ .चिन्ना बाबु कुनचाल्ला (वय २९, रा़ कपरालतिप्पा, बिटरगुंटा, ता़ कावलीजी, जि़ नेल्लुर, आंध्रप्रदेश), विजयकुमार शेखर रेड्डी (वय २६), सॅम्युल राज तिमोती राज (वय २५), चल्ला सनी येलीया सल्ला (वय २६), राजेश जेमीस गोगुल (वय २३), संतोष देवरकोंडा रामलुर (वय ३६), राकेश दावित आवला (वय १९), येशेबु जानु गोगला (वय ५२), शिवकुमार रविबाबु पिटला (वय ३६), उतजल सुबलु आवला (४०), सुभाष रवि बानाळु (वय २९) व्हिकअर रविबाबु पिटला (वय ३०), आमुस तिपय्या आवला (वय ३२), माधव सुंदरम गोगला (वय ३७, सर्व रा़ आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहे़. केशवनगर येथील निर्जन ठिकाणी असलेल्या बंगल्यावर ते दरोडा टाकणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले़ . याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी माहिती दिली़ . हे सर्व जण आंध्र प्रदेश, तामिळनाडुच्या सीमेवरील गावात राहणार आहेत़. चित्रा कुनचाल्ला व माधव गोगला यांच्या वेगवेगळ्या दोन टोळ्या असून त्या एकाच राज्यातील व गावातील आहे़.त्या दोन्ही टोळ्या गंभीर गुन्हे करतेवेळी एकत्र येऊन दरोड्यासारखे गुन्हे करतात़ . आता पकडण्यात आलेले हे सर्व माधव गोगला टोळीतील आहे. त्या व्यतिरिक्त दोन्ही टोळ्या वेगवेगळ्या राज्यात व शहरांमध्ये जे ग्राहक बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जातात़ त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या अंगावर खुजली पावडर टाकून, अंगावर घाण पडल्याचे सांगून विविध पद्धतीने त्यांची नजर चुकवून त्यांच्याकडील पैसे असलेली बॅग चोरुन नेतात, असे तपासात निष्पन्न झाले आहे़. त्यांनी मुंढवा, हडपसर, वानवडी, कोंढवा, चंदननगर, विमाननगर, भोसरी एमआयडीसी, पुणे ग्रामीण व ठाणे शहर व ठाणे ग्रामीण तसेच तामिळनाडू , आंध्र प्रदेश, कर्नाटक इत्यादी ठिकाणी अशा पद्धतीने गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे़. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी, हवालदार सोनवणे, चव्हाण, जगताप, गायकवाड, चव्हाण, शिंदे, विभुते, काकडे, भापकर यांनी ही कामगिरी केली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसRobberyदरोडा