ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।। पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 10:00 IST2022-12-01T10:00:37+5:302022-12-01T10:00:46+5:30
‘श्रीगणेश अथर्वशीर्ष’ हा एक श्रेयांकाचा अभ्यासक्रम विनामूल्य ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध

ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।। पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम तयार
पुणे : संस्कृत व प्राकृत विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकमान्य टिळक महाविद्यालय, संस्कृत विभाग व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीगणेश अथर्वशीर्ष’ हा एक श्रेयांकाचा अभ्यासक्रम विनामूल्य ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केला आहे.
हा अभ्यासक्रम कोणत्याही पदवी/पदव्युत्तर पदवीचा आवश्यक भाग नसून, अतिरिक्त श्रेयांकाचा सक्तीचा नसलेला निःशुल्क ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. याला विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली आहे. तसे पत्र दि. १९ सप्टेंबर रोजी जारी केले आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश भारतीय संस्कृतीमधील संस्कृत स्तोत्रांचा अर्थ समजावून सांगणे व त्यामागील शास्त्रोक्त अर्थ/व्याकरण पोहोचवणे असा आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय भाषा, भारतीय संस्कृती, भारतीय मूल्ये यांच्यामधील विविध स्तोत्र व वाङ्मय अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. विविध माध्यमांमध्ये या अभ्यासक्रमाविषयी अभ्यासकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. अभ्यासकांनी या अभ्यासक्रमाविषयी सूचना केल्यास सुयोग्य बदल विद्यापीठ अधिकार मंडळाद्वारे विचार करून करण्यात येतील. याद्वारे सदर अभ्यासक्रम शास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक समृद्ध होईल.