कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 11:14 IST2022-03-23T11:10:09+5:302022-03-23T11:14:26+5:30

पुणे : गजा मारणे याच्या मुलाने एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका २२ ...

gajanan marane son charged with rape case | कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : गजा मारणे याच्या मुलाने एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका २२ वर्षांच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रथमेश गजानन मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान घडली.

ही तरुणी एका महाविद्यालयात शिकत आहे. तिची आणि प्रथमेश मारणे यांची ओळख होती. मारणे याने तिला खडकवासला येथे फिरायला नेले. घरी परत येताना एका लॉजवर थांबून त्याने तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन प्रथमेश याने तिच्या नकळत तिचे परस्पर अश्लील व्हिडिओ बनवले. हे समजल्यावर तिने त्याला ते डिलीट करायची विनंती केली. पोलिसांमध्ये तक्रार देईन, असे सांगितले. तेव्हा त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शेवटी तिने धीर धरून पोलिसांकडे तक्रार दिली. जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यांनतर प्रथमेश मारणेने या पक्षात प्रवेश केला होता.   

तब्बल ८ वर्षानंतर गजानन मारणेची तुरुंगातून सुटका 

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करुन गुंड गजानन मारणे याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्ध केले होते. ही एक वर्षाची मुदत संपल्यानंतर नागपूर कारागृहातून मागच्या महिन्यात गजानन मारणे याची सुटका करण्यात आली होती. ८ वर्षानंतर गजानन मारणे हा तुरुंगाबाहेर आला आहे.

Web Title: gajanan marane son charged with rape case